Hyundai New SUV Car Launching : या चालू महिन्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उद्या देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आपली मोस्ट अवेटेड SUV कार लॉन्च करणार आहे. हुंडाई कंपनी उद्या नवीन कार विक्रीसाठी अधिकृतरित्या लॉन्चिंग करणार आहे. खरंतर ह्युंदाई ही देशातील एक लोकप्रिय कार निर्माता कंपनी आहे.
या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये क्रेटा या गाडीचा देखील समावेश होतो. या गाडीची लोकप्रियता भारतीय बाजारात खूपच अधिक आहे. हेच कारण आहे की, कंपनीने आता या गाडीचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार उद्या अर्थातच 16 जानेवारी 2024 ला ह्युंदाई कंपनी क्रेटा फेसलिफ्ट ही SUV कार लॉन्च करणार आहे.
खरे तर या गाडीची ऑफिशियल बुकिंग आधीच सुरू झालेली आहे. ग्राहकांना फक्त 21 हजार रुपये एवढे टोकन अमाऊंट देऊन ही गाडी बुक करता येणार आहे. आता उद्या ही गाडी अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च केली जाणार आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या किमतीवरुनही उद्याचं पडदा काढाला जाणार आहे. या गाडीची किंमत किती राहणार याबाबत उद्या कंपनीच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. यामुळे या गाडीच्या किमतीकडे सर्वांचे विशेष लक्ष राहणार आहे.
खरे तर नव्याने लॉन्च होणाऱ्या क्रेटा फेसलिफ्ट मॉडेल मध्ये कंपनीकडून अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. नवीन Hyundai Creta फेसलिफ्ट तीन इंजिन पर्यायांसह लाँच होणार आहे. ज्यात स्पोर्टी आणि पॉवर पॅक्ड 1.5 लिटर Kappa Turbo GDI पेट्रोल, 1.5 लिटर MPI पेट्रोल आणि 1.5 लिटर U2 CRDI डिझेल इंजिन पर्यायांचा समावेश राहणार आहे.
या नवीन कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरामिक सनरूफ, 8-स्पीकर (BOSE), हवेशीर फ्रंट सीट्स, 8-वे ऑपरेटेड ड्रायव्हर सीट, लेव्हल-2 ADAS सूट असे अनेक फीचर्स समाविष्ट राहणार अशी माहिती समोर आली आहे. ही गाडी सात वॅरीयंटमध्ये आणि सहा रंगात बाजारात लॉन्च होणार आहे. या गाडीची किंमत किती राहणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या गाडीची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.