Kia Seltos : सोडू नका अशी संधी! अवघ्या 1 लाखात खरेदी करता येतेय Kia ची ‘ही’ स्टायलिश कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kia Seltos : भारतीय बाजारात Kia च्या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही मागणीनुसार अनेक कार्स लाँच करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Kia Seltos ही कार बाजारात आणली आहे. जिने सर्वात जास्त विक्री केली आहे.

Seltos चे मायलेज 17.0 km प्रति लिटर आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 12.62 लाख रुपये इतकी आहे. परंतु जर तुमचे बजेट इतके नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही ही कार अवघ्या 1 लाख रुपयात घरी नेऊ शकता. कसे ते जाणून घ्या.

किती असेल किंमत?

कंपनीच्या Kia Seltos HTE बद्दल आम्ही बोलत आहोत जे या SUV चे बेस मॉडेल आहे. किमतीचा विचार केला तर या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 10,89,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे आणि ही किंमत ऑन रोड 12,62,655 रुपये इतकी होते.

जाणून घ्या फायनान्स प्लॅन

समजा तुम्हाला Kia Seltos कॅश पेमेंटद्वारे खरेदी करायचे असल्यास तर त्यासाठी तुमचे बजेट 12.62 लाख रुपये असणे गरजेचे आहे. समजा तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल, तर काळजी करू नका. या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरून ही शानदार SUV खरेदी घरी नेऊ शकता.

ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, समजा तुमचे बजेट 1 लाख रुपये असल्यास तर या रकमेच्या आधारे बँकेकडून तुम्हाला 11,62,655 रुपयांचे कर्ज मिळू शकते ज्यावर वार्षिक 9.8 टक्के व्याज आकारण्यात येत आहे.

आता या बेस मॉडेलवर हे कर्ज मंजूर झाले की तुम्हाला डाउन पेमेंट म्हणून 1 लाख रुपये जमा करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेने परतफेड करण्यासाठी 5 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला 24,589 रुपये मासिक EMI भरावा लागणार आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन

कंपनीने आपल्या Kia Seltos मध्ये 1497 cc इंजिन दिले आहे. जे 6300 rpm वर 113.42 bhp पॉवर आणि 4500 rpm वर 144 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.

मायलेज

मायलेजचा विचार केला तर Kia Motors चा मायलेजबाबत असा दावा आहे की Seltos चे मायलेज 17.0 km प्रति लिटर आहे. हे मायलेज ARAI ने प्रमाणित करण्यात आले आहे.