Kia Seltos Facelift : किआ सेल्टोस फेसलिफ्ट खरेदी करण्यासाठी करावी लागणार ‘इतक्या’ महिन्यांची प्रतीक्षा, पहा किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kia Seltos Facelift : किआ कार निर्माती अनेक कार भारतीय ऑटो बाजारात सादर करत आहेत. तसेच या कारला ग्राहकांचा देखील चांगला रतिसाद मिळत आहे. आता नुकतीच त्यांची Seltos Facelift २०२३ ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे.

किआ कंपनीकडून त्यांची सेल्टोस कार २०१९ मध्ये भारतात लॉन्च केली आहे. तसेच या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनतर आता कंपनीकडून Seltos Facelift लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे बुकिंग देखील जोरात सुरु असल्याचे समोर आले आहे.

किआ कंपनीकडून त्यांच्या Seltos Facelift कारच्या किमती देखील जाहीर केल्या आहेत. ग्राहकांना ही कार खरेदी करायची असेल तर त्यांना आता काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Seltos Facelift कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपयांपासून सुरु होते. तर त्यांच्या टॉप-एंड X-Line ट्रिम व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे. चला तर जाणून घेऊया Seltos Facelift खरेदी करण्यासाठी किती महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

Kia Seltos Facelift चा प्रतीक्षा कालावधी

Seltos Facelift कार लॉन्च झाल्यापासून या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टॉप-लाइन HTX+ आणि GTX+ या दोन मॉडेलला ग्राहकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे. टॉप मॉडेलसाठी तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल तर त्या खालच्या मॉडेलसाठी आठ आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

Kia Seltos Facelift चे प्रकार आणि वैशिष्ट्ये

सेल्टोस फेसलिफ्ट कार अनेक धमाकेदार वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. या ही कार डिझाइन अपडेट्स, केबिन अपग्रेड, पॅनोरामिक सनरूफ, ADAS लेव्हल 2 तंत्रज्ञान आणि सर्व-नवीन 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कारच्या फ्रंट सीट्समध्ये एसी देण्यात आला आहे. तसेच पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि ड्युअल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल देण्यात आले आहे. केबिनमध्ये वायरलेस फोन चार्जिंग आणि आठ स्पीकर बोस साउंड सिस्टीम देण्यात आली आहे.

किआ सेल्टोस फेसलिफ्टची रचना

किआ सेल्टोस फेसलिफ्टच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. एक मोठा टायगरनोज ग्रिल आणि सर्व-नवीन LED DRL देण्यात आला आहे. दोन्ही बाजूला नवीन 4-पॉइंट फॉग लाईट्स असताना समोरचा बंपर देखील आकाराने वाढवण्यात आला आहे.