ऑटोमोबाईल

Kia Sonet Price Hike : किआ सोनेटच्या किमतीत मोठी वाढ, बघा किती रुपयांनी महागली…

Published by
Ahmednagarlive24 Office

Kia Sonet Price Hike : भारतीय बाजारपेठेत सर्वात लोकप्रिय असलेली Kia Sonet आता महागली आहे. कपंनीने नुकतीच याच्या किमतीत वाढ जाहीर केली असून, Kia Sonet च्या निवडक व्हेरियंटच्या किमती आता 27,000 रुपयांनी वाढल्या आहेत. लक्षात घ्या Kia Sonet बाजारात एकूण 9 व्हेरिएंट विकते. ज्यात HTE, HTE(O), HTK, HTK(O), HTK+, HTX, HTX+, GTX, GTX+ X Line चा समावेश आहे.

Kia Sonet च्या किमती वाढल्यानंतर कपंनीने Kia Sonet च्या GTX 1.5-लीटर डिझेल AT प्रकारात सर्वात कमी वाढ करण्यात केली आहे. या मॉडेलवर केवळ 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. HTX 1.5-लीटर डिझेल MT प्रकारात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये

Kia Sonet मध्ये समाविष्ट असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या कारला क्लायमेट कंट्रोल आणि दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी सेंटर आर्मरेस्ट, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अपहोल्स्ट्रीसाठी नवीन शेड्स मिळतात. तसेच, नवीन बंपर, हेडलॅम्प, लॅम्प सिग्नेचर, फॉग लॅम्प हाउसिंग आणि अलॉय व्हील्स, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अपहोल्स्ट्रीसाठी नवीन शेड्स, केबिनमधील नवीन स्विचगियर, नवीन डॅशबोर्ड लेआउट, सेल्टोस स्क्रीन यासारख्या अपडेट केलेल्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी, एस कारमध्ये एबीएस, ईबीडी, हिल असिस्ट या वैशिष्ट्यांसह एडीएएस तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

पॉवर इंजिन

दक्षिण कोरियन कंपनी किआ मोटर्सच्या सोनेट या लोकप्रिय कारमध्ये एकूण 3 इंजिन – 1.2-लिटर पेट्रोल, 1.0-लिटर, टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर, डिझेल इंजिन पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. ट्रान्समिशनसाठी, ते 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड iMT सह 7-स्पीड DCT, 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.

किंमत

Kia Sonet भारतीय बाजारपेठेत 7.99 लाख रुपयांपासून ते 15.77 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्रीसाठी ऑफर करण्यात आली आहे. ही कार त्याच्या सेगमेंटमध्ये टाटा नेक्सन आणि मारुती सुझुकी ब्रेझा यांच्याशी स्पर्धा करते.

Ahmednagarlive24 Office