Kia Syros HTX Diesel:- किआने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही सायरोस लाँच केली आहे.जी चार मीटरच्या आत येणाऱ्या SUV सेगमेंटमध्ये विशेषतः लोकप्रिय ठरू शकते. जर तुम्ही या गाडीचा डिझेल व्हेरिएंट HTX खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि २ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर महिन्याला EMI किती असेल हे जाणून घेऊ इच्छित असाल तर याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आपल्याला विविध आर्थिक घटकांच्या आधारे करता येईल.
Kia Syros HTX फायनान्स प्लॅन

दिल्लीमध्ये किआ सायरोस डिझेल HTX ची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 12.40 लाख रुपये आहे. मात्र ऑन-रोड किंमत निश्चित करताना RTO शुल्क, विमा आणि इतर सरकारी कर जोडले जातात. त्यामुळे दिल्लीसारख्या मोठ्या शहरात या गाडीची ऑन-रोड किंमत साधारणतः 14.70 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
वाहन खरेदी करताना बहुतांश ग्राहक काही प्रमाणात डाउन पेमेंट करून उर्वरित रक्कम बँकेतून कर्ज स्वरूपात घेतात. जर तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट केले तर उर्वरित रक्कम म्हणजेच 10.40 लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात फाइनान्स करावी लागेल.
बँका साधारणतः कार लोनसाठी वार्षिक 9% व्याजदर आकारतात. जर तुम्ही हे कर्ज 7 वर्षांसाठी म्हणजेच 84 महिन्यांसाठी घेतले, तर तुम्हाला मासिक EMI साधारणतः 16750 रुपये भरावा लागेल.
या कालावधीत तुमच्या कारसाठी एकूण 3.65 लाख रुपये व्याज द्यावे लागेल, त्यामुळे कारची एकूण किंमत (कर्ज रक्कम + व्याज) 16.05 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे जरी कारची एक्स-शोरूम किंमत 12.40 लाख रुपये असली तरी प्रत्यक्ष खरेदी करताना तिचा एकूण खर्च अधिक वाढू शकतो.
किआ सायरोस डिझेल HTX हा एक उत्तम पर्याय बाजारातील इतर SUV मॉडेल्सशी थेट स्पर्धा करते.विशेषतः टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, महिंद्रा XUV 3XO, किया सोनेट, निसान मॅग्नाइट आणि स्कोडा किलॅक यांसारख्या वाहनांशी त्याची तुलना केली जाते.
त्यामुळे या संपूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही कोणते वाहन खरेदी करायचे हे ठरवू शकता. फायनान्ससंदर्भात अधिक अचूक माहिती हवी असल्यास तुमच्या जवळच्या बँक किंवा डीलरशी संपर्क साधणे श्रेयस्कर राहील.