ऑटोमोबाईल

महेंद्राच्या XUV700 ने मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय ! हजारो कारची होतेय विक्री, जाणून घ्या किंमत, फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Mahendra’s XUV700 : दमदार , स्टायलिश वाहने कोणाची तर महिंद्राची.. असे एक छुपे समीकरणच तयार झाले आहे. महेंद्रच्या वाहनांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. रस्ते कसेही असले तरी महिंद्राची वाहने एकदम दमदार पणे चालतात असा अनुभव आहे.

दरम्यान मागील काही दिवसात महिंद्राची XUV700 मार्केटमध्ये धुमाकूळ घालतात आहे. ही 7 सीटर कार असल्याने मोठ्या फॅमिलीसाठी याची डिमांड वाढत आहे. विशेष म्हणजे याची किंमतही अगदी माफक आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये एकाचमहिन्यात या वाहनांची एकूण 9297 युनिट्सची विक्री झाली आहे.

सप्टेंबरमध्ये 8555 युनिट्स विकले गेले होते. याची लोकप्रियता किती आहे हे तुम्हाला यावरून लक्षात येईल की या कार साठी 25 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी असून नोव्हेंबरसाठी 70,000 हजार युनिट्सची डिलिव्हरी बाकी आहे. तर मग या अशा लोकप्रिय XUV700 विषयी जाणून घेऊयात –

XUV700 चे स्पेसिफिकेशन्स

या कारमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन देण्यात आले आहेत. Mahindra XUV700 ही पाच रंगात तुम्हाला मिळते. यात 240 लीटरची बूट स्पेस असल्याने खूप जागा वापरायला मिळते. या कारमध्ये फाईव्ह व सेव्हन सीटर असे दोन पर्याय पाहायला मिळतात.

1999 cc आणि 2198 cc असे यात दोन इंजिन पर्याय असून ही कार तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये मार्केटमध्ये मिळून जाईल. यात जवळपास 12 स्पीकर तुम्हाला मिळतील. याचे टर्बो इंजिन 200 PS ची शक्ती आणि 380 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

आता विषय येतो या कारच्या किमतीचा. याची किंमत देखील एकदम माफक दरात आहे. याची प्रारंभिक किंमत 14.03 लाख रुपये असून टॉप मॉडेल 26.57 लाख रुपयांपर्यंत जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये सेफ्टी साठी सात एअरबॅग देण्यात आल्या आहेत. त्यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत. सद्य स्थितीत मार्केटमध्ये या कारचा जलवा पहायला मिळत आहे. तुम्ही देखील फॅमिलीसाठी मोठी कार घेऊ इच्छित असाल तर हा पर्याय तुम्हाला एकदम भारी ठरेल.

Ahmednagarlive24 Office