Mahindra Bolero Neo Price : येत्या काही दिवसांत कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीने आपल्या काही लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत वाढ केली आहे.
महिंद्रा इंडियाने बोलेरो निओच्या किमतीत देखील वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीने ही लोकप्रिय गाडी 14 हजार रुपयांनी महाग केली आहे. खरे तर बोलेरो ही ग्रामीण आणि शहरी भागातील लोकप्रिय SUV आहे.
या गाडीची लोकप्रियता पाहता कंपनीने Bolero Neo ही 3-लाइन एसयूव्ही लाँच केली आहे. आता याच बोलेरो निओच्या किंमतीत 14,000 रुपयांची वाढ झाली आहे.
या दरवाढीसह, बोलेरो निओ 9,94,600 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध होणार आहे. यामुळे जर तुम्हीही येत्या काही दिवसात बोलेरो निओ ही गाडी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आता या गाडीसाठी अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे.
दरम्यान आता आपण कंपनीने कोणत्या वेरियंटची किंमत वाढवली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या व्हेरिएंटची किंमत वाढली ?
महिंद्रा बोलेरो निओ N4, N8, N10 आणि N10 (O) या चार व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जात आहे. मात्र या चार पैकी फक्त दोनच व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत. N4 आणि N8 या दोन व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत.
या दोन्ही प्रकाराच्या किमती अनुक्रमे 5,000 रुपये आणि 14,000 रुपयांनी वाढल्या आहेत. म्हणजे N4 ची किंमत पाच हजार रुपयांनी आणि N8 ची किंमत 14 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
निश्चितचं जर तुम्हीही ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आता अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. त्याच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, बोलेरो निओ 1.5-लिटर डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
ही ऑइल बर्नर मोटर 100bhp पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी ट्यून केलेली आहे, तर सर्व प्रकार मानक म्हणून RWD म्हणून कॉन्फिगर केले आहेत. N10 (0) उत्तम ऑफ-रोडिंग कौशल्यांसाठी मल्टी-टेरेन तंत्रज्ञानासह येते.
त्यामुळे ही गाडी ऑफ रोड प्रवासासाठी ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय होऊ लागले आहे. जे ऑफ रोड प्रवास करतात ते ग्राहक मोठ्या प्रमाणात या गाडीच्या खरेदीला प्राधान्य दाखवत आहेत.