ऑटोमोबाईल

Mahindra Car Offers: दिवाळीमध्ये आली महिंद्रा कंपनीच्या कार घेण्याची सुवर्णसंधी! महिंद्राच्या ‘या’ कार्सवर मिळत आहे 1 लाखापेक्षा अधिकची सूट

Published by
Ajay Patil

Mahindra Car Offers:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक अशा डिस्काउंट ऑफर राबविण्यात येत असून या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून केला जात आहे व या स्पर्धेमध्ये आता भारतातील प्रमुख आणि आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा देखील मागे नाही.

महिंद्रा कंपनीने ग्राहकांकरिता नवनवीन डिस्काउंट ऑफर्स आणि डील्स उपलब्ध करून दिल्या असून यावर्षी महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून काही निवडक एसयूव्ही 2023-24 या वर्षाच्या काही कार मॉडेल्सवर चांगली सूट देण्यात येणार आहे. याबद्दलचीच माहिती या लेखात बघू.

 महिंद्रा कंपनी कडून कोणत्या कार्सवर मिळेल दिवाळी डिस्काउंट?

1- महिंद्रा एक्सयुव्ही 300- महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची ही अतिशय चांगली विक्री होणारी एसयूव्ही कार पैकी एक असून या कारची जागा आता महिंद्राच्या XUV 3XO ने घेतल्यामुळे कंपनीच्या बऱ्याच आऊट लेटमध्ये या कारची विक्री झालेली नाही व त्यामुळे आता शिल्लक युनिटवर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 1.8 लाख रुपये पर्यंत सूट देण्यात येत आहे.

2- महिंद्रा एक्सयुव्ही 400- महिंद्राची एक्सयुव्ही 400 ईव्हीची मागील एक वर्षापासून विक्री कमी झालेली आहे व त्यामुळे आता या कारवर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त सूट दिली जात आहे. तसेच या कारचे काही युनिट शिल्लक आहेत व ते MY 2023 च्या बॅचचे असल्याने त्यावर 4.4 लाख रुपये पर्यंत सूट दिली जात आहे.

3- महिंद्रा एक्सयुव्ही 700- या कारच्या किमती कंपनीच्या माध्यमातून या वर्षी अनेकदा कमी करण्यात आलेल्या आहेत व इतकेच नाही तर या कारच्या फिचरमध्ये देखील बदल केले आहेत. या कारचे जे युनिट शिल्लक आहेत त्यावर एक लाख आठ हजार रुपये पर्यंत सूट सध्या उपलब्ध आहे.

4- महिंद्रा स्कार्पियो क्लासिक स्कॉर्पिओ क्लासिक गाडीचा एक वेगळा ग्राहक वर्ग असून स्कॉर्पिओ N च्या लॉन्च नंतर यामध्ये अनेक अपडेट करण्यात आले आहेत. या कारच्या जुन्या स्टॉक वर साधारणपणे एक लाख दोन हजार रुपयापर्यंत सूट दिली जात आहे.

5- महिंद्रा स्कॉर्पिओ एन महिंद्रा स्कॉर्पिओ एन एक लोकप्रिय अशी कार असून या कारमध्ये ऑटोमॅटिक तसेच मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आले असून अनेक सिटिंग कॉन्फिगरेशन आणि काही वेरियंटमध्ये चार विल ड्राईव्ह हार्डवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवाळीमध्ये या एसयूव्हीवर एक लाख रुपये पर्यंतची सूट दिली जाणार आहे.

6- महिंद्रा थार या दिवाळीमध्ये थार 3 डोअरवर एक लाख सहा हजार रुपये पर्यंत सूट दिली जाणार आहे.

Ajay Patil