ऑटोमोबाईल

600 km ची रेंज देतात महिंद्राच्या ‘या’ दोन्ही इलेक्ट्रिक कार! काही मिनिटात होतात 20 ते 80% पर्यंत चार्ज

Published by
Ajay Patil

Mahindra Electric Car:- सध्या भारतासह संपूर्ण जगामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व कार उत्पादक कंपन्यांचे संपूर्ण लक्ष केवळ इलेक्ट्रिक कार निर्मितीवर केंद्रित असून अनेक इलेक्ट्रिक कारचे नवनवीन मॉडेल सध्या बाजारात येताना आपल्याला दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर देशातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाणारी महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने मागच्या महिन्यात म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी दोन उत्तम अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या.अनेक ग्राहकांना असलेली महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा त्यादिवशी संपली.

महिंद्राने लॉन्च केलेल्या या दोन्ही इलेक्ट्रिक कारची नावे बघितली तर यामध्ये एकीचे नाव Mahindra XEV 9e आणि दुसरीचे नाव Mahindra BE 6e असे आहे. या दोन्हीही महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी महिंद्राच्या या दोन्ही कार अतिशय फायद्याच्या ठरतील.

महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये?
महिंद्राच्या या दोन्ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही Mahindra XEV 9e आणि Mahindra BE 6e या दोन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्य देण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही कारचे डिझाईन आणि लूक देखील खूपच खास पद्धतीचा आहे. या दोन्ही कारमध्ये एलईडी लाईट, एलइडी डीआरएल, फ्लश डोअर हँडल,

अलॉय व्हील्स, एलुमिनेटेड लोगो, ॲम्बिइंट लाइटिंग, प्रीमियर इंटेरियर, पेनॉरॅमिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखे अनेक वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.

तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या दोनही कारची रचना करण्यात आली असून यामध्ये सुरक्षिततेसाठी सहा एअर बॅग,अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, एबीएससह ईबीडी, हिल असिस्ट, ADAS, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यासारख्या अनेक सुविधा देण्यात आले आहेत.

कारमध्ये देण्यात आले आहेत बॅटरीचे दोन पर्याय
महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला दोन बॅटरी पर्याय दिले आहेत. यामध्ये 59 kWh आणि 79 kWh क्षमतेच्या बॅटरी पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे.

175 kW चा चार्जर असलेली ही कार अवघ्या वीस मिनिटात 20 ते 80% चार्ज करता येते. या दोन्ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सहाशे किलोमीटर पर्यंत रेंज देतात म्हणजे सहाशे किलोमीटर प्रवास करू शकतात. या दोन्ही कारपैकी Mahindra XEV 9e आकाराने थोडी मोठी आहे.

Ajay Patil