Mahindra Scorpio N Pickup Truck : 15 ऑगस्टला लॉन्च होणार महिंद्राचा शक्तिशाली स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक, टोयोटा Hilux ला देणार टक्कर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Scorpio N Pickup Truck : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून दिवसेंदिवस त्यांच्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच त्यांच्या कार भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय देखील होत आहेत. आता महिंद्रा कंपनीकडून त्यांचा शक्तीशाली स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक लॉन्च केला जाणार आहे.

महिंद्रा कंपनीकडून दक्षिण आफ्रिकेत 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा हा पहिला स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक लॉन्च केला जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना महिंद्रा कंपनीचा स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक देखील खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

शक्तिशाली ट्रक वाळवंट, पर्वत आणि खराब रस्त्यांमध्ये दमदार कामगिरी करणार

महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या या पहिल्या स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या टीझरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या या ट्रकमध्ये 4 व्हील ड्राइव्ह पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे महिंद्रा थारसारखाच हा ट्रक देखील वाळवंट, पर्वत आणि खराब रस्त्यांवर दमदार कामगिरी करण्यास सक्षम आहे.

त्याला Z121 कोडनेम देण्यात आले आहे

महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या या स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकचे कोडनेम Z121 असे ठेवण्यात आले आहे. कंपनीकडून स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकच्या पॉवरट्रेन आणि किमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन

स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकमध्ये कंपनीकडून 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन पर्याय देण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये टर्बो इंजिनचा देखील पर्याय पाहायला मिळणार आहे. हे इंजिन 203bhp पॉवर आणि 370Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे देखील पर्याय मिळणार आहेत.

स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकला मिळणार ही वैशिष्ट्ये

स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकमध्ये वर्टिकल टेललॅम्प, मोठे टायर आणि इलेक्ट्रिक सनरूफ असे फीचर्स दिले जाऊ शकतात. अशा ट्रकला परदेशात खूप मागणी आहे. त्यामुळे कंपनीकडून दक्षिण आफ्रिकेमध्ये हा ट्रक सादर केला जाणार आहे.

Toyota Hilux आणि Isuzu V-Cross शी स्पर्धा करणार

महिंद्रा कंपनीचा हा ट्रक Toyota Hilux आणि Isuzu V-Cross ला टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे. टू व्हील ड्राइव्ह, लाँग व्हीलबेस, ट्रे-बॅक बेड, सिंगल आणि डबल-कॅब बॉडी स्टाइल स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकमध्ये देण्यात येईल. 2025 पर्यंत स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक भारतात लॉन्च जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.