Mahindra THAR 5 Door : जर तुम्ही महिंद्रा थारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण कंपनीने Mahindra THAR 5 Door बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा थार ही त्याच्या विभागातील सर्वात लोकप्रिय ऑफ-रोडिंग SUV पैकी एक आहे आणि 5 Door आवृत्तीची देशभरातील अनेकांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे. आतापर्यंत, वेगवेगळ्या प्रसंगी, 5 Door असलेली महिंद्रा थार देखील चाचणी दरम्यान दिसून आली आहे.
प्रत्येक वेळी ही एसयूव्ही रस्त्यावर दिसली की चाहत्यांच्या मनात ती चालवण्याची इच्छा प्रबळ होत असे. पण आता याच्या लॉन्चबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, असे सांगण्यात येत आहे की कंपनी याला यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी बाजारात लॉन्च करेल.
महिंद्र थारच्या 5-डोर व्हर्जनबाबत आतापर्यंत अनेक बातम्या समोर येत आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, ती याच वर्षी बाजारात दाखल होईल. मात्र अखेर कंपनीने या सर्व अटकळांना पूर्णविराम देत एसयूव्हीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी सांगितले की, थार 5-डोर वर्ष २०23 मध्ये लॉन्च केले जाणार नाही तर ते पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लॉन्च केले जाईल. महिंद्राच्या चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 23 च्या आर्थिक निकालांच्या घोषणेदरम्यान माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना जेजुरीकर यांनी ही माहिती दिली आहे.
मारुती जिमनीचा रस्ता सोपा झाला
ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात लाँच झालेल्या महिंद्र थारच्या सध्याच्या 3-Door आवृत्तीला जास्त मागणी आहे. अलीकडेच, कंपनीने आपला परवडणारा RWD प्रकार देखील बाजारात लॉन्च केला आहे. THAR 5-Door बाबत कंपनीच्या या निर्णयामुळे मारुती जिमनीचा रस्ता जवळपास सोपा झाला आहे.
मारुती सुझुकी आपल्या जिमनीची 5-Door आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जे जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होईल. या दोन्ही एसयूव्हीकडे एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे.