Mahindra Thar EV : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही थार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही कार लाँच करण्यात आलेली नाही. पण कंपनीकडून इलेक्ट्रिक थारची चाचणी देखील घेण्यात येत आहे.
महिंद्रा इलेक्ट्रिक थारचे काही फोटो आणि फीचर्स समोर आले आहेत. कारच्या समोरील फॅशियाला लोखंडी जाळीवर Thar.E लिहिलेले दिसत आहे.
तसेच LED लाइट स्लॅटसह चौकोनी आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्स देखील इलेक्ट्रिक थारमध्ये पाहायला मिळत आहे. थार EV ला आकर्षक नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळत आहेत.
भारतीय ऑटो मार्केटमध्ये थारची लोकप्रियता सर्वाधिक आहे. तरुणांमध्ये थार एसयूव्हीची क्रेझ पाहायला मिळत आहे. आता पेट्रोल आणि डिझेल थार नंतर इलेक्ट्रिक थार देखील लवकरच लॉन्च होणार आहे.
येत्या काही वर्षांत भारतात Thar EV लॉन्च केली जाईल. केपटाऊनमध्ये आयोजित फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये Thar.e चे अनावरण करण्यात आले आहे.
महिंद्रा थार EV बाबत अपडेट
सध्या महिंद्राकडून त्यांची 3 डोअर थार भारतात विकली जात आहे. 2WD आवृत्ती मागील वर्षीच्या सुरुवातीला लाइन-अपमध्ये सामील झाली आहे. आता लवकरच कंपनीकडून 5 डोअर थार यावर्षी लॉन्च केली जाणार आहे. इलेक्ट्रिक थार 3 डोअर व्हर्जनमध्येच लॉन्च केली जाणार आहे.
महिंद्रा थार EV वैशिष्ट्ये
महिंद्रा कार कंपनीकडून इलेक्ट्रिक थार एसयूव्ही कारमध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एक सर्व-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील यासह अनेक फीचर्स दिले जाणार आहेत.
थार EV रेंज आणि बॅटरी पॅक
महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या इलेक्ट्रिक थार एसयूव्ही कारची अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इलेक्ट्रिक थार एसयूव्ही कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाणार आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 450 किमी रेंज देण्यास सक्षम असण्याची शक्यता आहे.