Mahindra Upcoming Electric Car : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आली आहे. विशेष म्हणजे सरकार देखील सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील सरकारकडून अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. हेच कारण आहे की भारतात इलेक्ट्रिक कार ची संख्या वाढत चालली आहे.
अनेक दिग्गज ऑटो कंपन्या आता नवनवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. दरम्यान नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनी भारतीय बाजारात लवकरच दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
खरे तर सध्या स्थितीला इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलला आहे. या सेगमेंटमध्ये टाटा कंपनीने सर्वात जास्त कार लाँच केल्या आहेत. मात्र आता इतरही कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये जोरदार कामगिरी करत आहेत. टाटा सोबतच इतरही अनेक दिग्गज ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीला प्राधान्य दाखवत आहेत.
अशातच आता महिंद्रा कंपनी नजीकच्या काळात दोन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना आता नवीन विकल्प उपलब्ध होणार आहे. दरम्यान आज आपण महिंद्रा कंपनीच्या या आगामी काळात लॉन्च होणाऱ्या इलेक्ट्रिक कारची माहिती पाहणार आहोत.
महिंद्रा XUV.e8 : इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलला आहे. मात्र आता टाटा कंपनीच्या या मक्तेदारीला महिंद्रा आव्हान देणार आहे. महिंद्रा आपल्या लोकप्रिय SUV XUV 700 चे सर्व-इलेक्ट्रिक प्रकार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आता चांगली स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
महिंद्रा आगामी काळात जी ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे तिला महिंद्रा XUV.e8 असे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब अशी की ही कार येत्या काही महिन्यांनी बाजारात दिसणार आहे. 2024 च्या अखेरपर्यंत ही गाडी लॉन्च होणार असा दावा होत आहे. महिंद्राची आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही 60kWh आणि 80kWh बॅटरी पॅकसह लॉन्च केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 450 किलोमीटर पर्यंत धावणार आहे. या गाडीच्या किमती बाबत मात्र अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या गाडीची किंमत किती राहणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार राहणार आहे.
महिंद्रा 3XO EV : महिंद्रा अँड महिंद्रा ही देशातील एक लोकप्रिय ऑटो मेकर कंपनी आहे. या कंपनीने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय SUV XUV 300 ची अद्यतनित आवृत्ती लॉन्च केली आहे, ज्याचे नाव XUV 3X0 असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही गाडी लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. लॉन्च होताच Mahindra XUV 3X0 ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे कंपनी चांगलीच गदगद झाली आहे.
त्यामुळे कंपनीने आता या मॉडेल चे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. Mahindra XUV 3X0 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाऊ शकते.
या आगामी इलेक्ट्रिक कार मध्ये कंपनी 35kWh ची बॅटरी पॅक देणार आहे. पण, या गाडीची ड्रायव्हिंग रेंज किती राहणार या संदर्भात अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या आगामी इलेक्ट्रिक कार च्या किमती बाबत बोलायचं झालं तर याची किंमत ही 14 लाखांपासून ते 17 लाख रुपये पर्यंत राहील असा दावा केला जात आहे.