Mahindra XUV700:- भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी स्पोर्ट युटीलिटी वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली प्रसिद्ध एसयूव्ही अपडेट केली असून ती लॉन्च केली आहे. या नवीन एसयुव्ही मध्ये आता अनेक बदल करण्यात आलेले असून त्यामध्ये अनेक नवीन फीचरचा समावेश करण्यात आला असून ती आता त्यासह अपडेट करण्यात आली आहे.
त्यामुळे मागील मॉडेल पेक्षा ही एसयूव्ही आता अधिक आकर्षक बनवण्यात आलेली आहे. या कारमध्ये आकर्षक असा लूक आणि पावरफुल इंजिन देण्यात आलेले असून अनोख्या ड्रायव्हिंगचा अनुभव देण्यासाठी ही एसयुव्ही कार सज्ज आहे. कंपनीने आता AX7L पेरियंटमध्ये कस्टम सीट प्रोफाइल सोबतच फर्स्ट इन सेगमेंट मेमरी ORVM आणि AX7 आणि AX7L या दोन्ही प्रकारांमध्ये कॅप्टन सीटच्या पर्यायासोबतच हवेशीर फ्रंट सीट समाविष्ट करण्यात आले असून यामुळे या एसयूव्ही कारला आणखी आरामशीर असा फील मिळतो.
महिंद्राच्या या एक्सयुव्ही 700 चे वैशिष्ट्ये
या नवीन XUV700 आता सर्व प्रकारांमध्ये अगदी नवीन नेपोली ब्लॅक रंगात येते व याशिवाय AX7 आणि AX7L प्रकारावर एक विशेष ब्लॅक टीम देण्यात आली असून ज्यामध्ये कमांडिग ब्लॅक ग्रील आणि आकर्षक ब्लॅक अलॉय व्हील आहेत. याशिवाय AX7 आणि AX7L प्रकाराकरिता पर्यायी ड्युअल टोन बाह्य पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तसेच कंपनीच्या माध्यमातून या कारच्या केबिनमध्ये काही बदल केले असून एअर व्हेंट्स आणि सेंट्रल कन्सोलवर स्टायलिश डार्क क्रोम फिनिश देण्यात आले आहे. 83 कनेक्ट केलेल्या कार वैशिष्ट्यांसह ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारला असून ज्यामध्ये इकोसेन्स लीडर बोर्ड, एम लेंस आणि टोल डायरी सारखी तेरा नवीन अतिरिक्त वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आले आहेत
जे फर्म वेअर ओव्हर द एअर अपडेटसह येतात. यामध्ये महिंद्रा कंपनीने तंत्रज्ञानाशी संबंधित काही प्रश्न आणि इन्फोटेन्मेंट वर वाहन ए कॉल द्वारे तात्काळ मदत मिळवण्यासाठी ASK महिंद्रा ही नवीन सेवा देखील सुरू करण्यात आलेली असून आठवड्याच्या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
Mahindra XUV700: महिंद्राने लॉन्च केली 83 कनेक्ट वैशिष्ट्ये असलेली एसयूव्ही! वाचा या कारची किंमत आणि जबरदस्त फीचर्स
ऑगस्ट 2021 मध्ये लॉन्च झाल्यापासून या XUV700 ची विक्री तब्बल एक लाख 40 हजार युनिटचा टप्पा ओलांडून पुढे गेले आहे. ज्यामुळे हा टप्पा गाठणारे महिंद्राच्या पोर्टफोलिओ मधील सर्वात वेगवान वाहन बनले आहे. तसेच कॅप्टन सीट्स आता नवीन XUV700 च्या AX7 आणि AX7L प्रकारांमध्ये उपलब्ध असतील व ज्यामुळे ते अधिक प्रीमियम बनण्यासाठी मदत करतील. एवढेच नाही तर AX7L प्रकारामध्ये मेमरी फंक्शनसह बाहेरील रियर व्ह्यू मिरर देखील प्रदान करण्यात आलेला आहे.
नवीन महिंद्रा XUV700 चे प्रकार आणि किंमत
1-XUV700MX व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 13 लाख 99 हजार रुपये आहे तर XUV700 AX3 व्हेरीअन्टची किंमत 16 लाख 39 हजार रुपये आहे.
2024 महिंद्रा XUV700 2.0 लिटर पेट्रोल आणि 2.2 लेटर डिझेल इंजनमध्ये उपलब्ध आहे व ज्यामध्ये डिझेल इंजन ड्युअल ट्यून मध्ये दिले जाते. तसेच पेट्रोल इंजिन 200bhp पावर जनरेटर करते तर डिझेल इंजन 155bhp किंवा 185bhp ची पावर जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असून पर्यायी AWD यामध्ये उपलब्ध असणार आहे.
आज पासून अधिकृत बुकिंग अधिकृत बुकिंग सुरू
नवीन महिंद्रा XUV700 चे अधिकृत बुकिंग आज पासून म्हणजेच 15 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आलेले असून कंपनीच्या म्हणण्यानुसार हे नवीन डेमो वाहन 25 जानेवारी 2024 पासून संपूर्ण भारतातील डीलरशिप मध्ये पोहोचवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
या नवीन एसयूव्हीची सुरुवातीची किंमत
या नवीन एसयूव्हीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 13 लाख 99 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.