Mahindra XUV700 Electric: Tata Nexon EV चं काय होणार ? ‘या’ दिवशी बाजारात येत आहे महिंद्राची सर्वात भारी इलेक्ट्रिक SUV , पहा फोटो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra XUV700 Electric: भारतीय बाजारात सध्या पेट्रोल आणि डिझेल कार्ससह मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार विकल्या जात आहे. यामुळे आज बाजारात एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये सध्या टाटा मोटर्स राज्य करत आहे. टाटाची लोकप्रिय एसयूव्ही Tata Nexon EV या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सपैकी एक कार आहे.

मात्र आता या सेगमेंटमध्ये Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी लोकप्रिय कार कंपनी महिंद्रा लवकरच त्यांची सर्वात भारी इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Mahindra XUV700 Electric लाँच करण्याची तयारी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या एसयूव्हीमध्ये ग्राहकांना कमी किमतीमध्ये भन्नाट रेंज आणि बेस्ट फीचर्स पाहायला मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया Mahindra XUV700 Electric बद्दल संपूर्ण माहिती.

समोर आलेल्या माहितीनुसार 2024 च्या अखेरीस कंपनी Mahindra XUV700 भारतीय बाजारात लाँच करू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी कंपनीने यूकेमध्ये एका कार्यक्रमात या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा कॉन्सेप्ट सादर केला होता. या कॉन्सेप्टनुसार या एसयूव्हीमध्ये क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल,बंपर-माउंटेड हेडलॅम्प, एक कंटूर केलेले बोनेट आणि एंगुलर स्टेन्स आहे. तथापि, कारचा एक्सटीरियर त्याच्या ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) पॉवरच्या मॉडेलसारखा दिसतो.

Mahindra XUV700 Electric फीचर्स

महिंद्राने आधीच खुलासा केला आहे की XUV700 इलेक्ट्रिक 80kWh पर्यंतच्या बॅटरी पॅकसह आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सिस्टमसह येईल. त्याची पॉवर 230bhp ते 350bhp दरम्यान असेल. हे वाहन-टू-लोड (V2L) फंक्शनसह एक्सटीरियर इलेक्ट्रिक उपकरणांना पावर देण्यासाठी येईल. इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये केबिनमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअपसह फ्रंट ट्रंक (किंवा फ्रंक) असेल. डिस्प्ले पॅनलमध्ये तीन 1920X720p हाय रिझोल्यूशन 12.3-इंच डिस्प्ले आणि वाढीव नेव्हिगेशनसह HUD असेल.

Mahindra XUV700 Electric रेंज

हे मॉडेल INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यामध्ये प्रमाणित सेल-टू-पॅक तंत्रज्ञानासह (ब्लेड आणि प्रिझमॅटिक सेल स्ट्रक्चर्स दोन्हीसाठी) सामान्य बॅटरी पॅक डिझाइन वापरल्याचा दावा केला जातो. INGLO आर्किटेक्चरवर आधारित, महिंद्राची सर्व-इलेक्ट्रिक SUV 60-80kWh पर्यंतची असेल आणि 175kW फास्ट चार्जरला सपोर्ट करेल. जलद चार्जर 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 80 टक्के पर्यंत बॅटरी चार्ज करते. कार निर्मात्याचा दावा आहे की 80kWh बॅटरी पॅक WLTP सायकल अंतर्गत सुमारे 435 किमी ते 450 किमीची रेंज देईल.

Mahindra XUV700 Electric डायमेंशन

Mahindra XUV700 इलेक्ट्रिक SUV ची लांबी 4740mm, रुंदी 1900mm आणि उंची 1760mm आहे आणि तिचा व्हीलबेस 2762mm आहे.

हे पण वाचा :- Bank Holiday 2023: .. म्हणून तब्बल 12 दिवस बँका रहाणार बंद ; RBI ने दिली मोठी माहिती