Mini Tractor:- महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेले उपकरणे तयार करण्यामध्ये अग्रगण्य असून महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. महिंद्रा कंपनीने आजपर्यंत अनेक विविध वैशिष्ट्ये आणि किमती असलेले ट्रॅक्टर्स मॉडेल बाजारात आणले असून शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खूप फायद्याचे ठरले आहेत.
महिंद्राचे बहुतेक ट्रॅक्टर हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येतात व कमीत कमी डिझेलमध्ये शेतीची जास्तीची कामे पूर्ण करण्याची क्षमता बाळगतात. महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टरमध्ये छोटे म्हणजेच मिनी ट्रॅक्टर देखील लाँच केलेले असून अशा पद्धतीचे ट्रॅक्टर हे छोटे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत व ते शक्तिशाली देखील आहे. असेच महिंद्राचे महिंद्रा युवराज 215 NXT हे मिनी ट्रॅक्टर खूप फायद्याचे असून कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर खूप चांगला पर्याय ठरू शकते.
महिंद्रा युवराज 215 NXT ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये ८६३.५ सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडरमध्ये वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे व ते 15 एचपी पावरसह 48 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने ऑइल बाथ प्रकारचे एअर फिल्टर दिले आहेत. या मिनी ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 11.4 एचपी आहे व त्याचे इंजिन 2300 आरपीएम जनरेट करते.
महिंद्रा युवराज 215 NXT ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 25.62 किलोमीटर प्रतितास तर रिव्हर्स स्पीड 5.51 किलोमीटर प्रतितास इतका आहे. या ट्रॅक्टरची इंधन टाकी 19 लिटरची असून हायड्रोलिक पावर 778 किलोग्राम इतकी आहे. या ट्रॅक्टरचे वजन 780 किलोग्रॅम असून त्याचा ग्राउंड क्लिअरन्स 245 mm इतका आहे.
या ट्रॅक्टरची
इतर महत्त्वाची वैशिष्ट्येमहिंद्रा युवराज 215 NXT मिनी ट्रॅक्टर मध्ये सिंगल ड्रॉप आर्म, मेकॅनिकल स्टेरिंग देण्यात आलेली आहे व हा ट्रॅक्टर सहा फॉरवर्ड+ तीन रिव्हर्स गियरसह गिअर बॉक्ससह येतो. तसेच यामध्ये सिंगल प्लेट ड्राय क्लचसह स्लाइडिंग मेश प्रकार देण्यात आला असून यामध्ये ड्राय डीस्क प्रकारचे ब्रेक देण्यात आले आहेत.हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो.
किती आहे
या ट्रॅक्टरची किंमत?महिंद्रा युवराज 215 NXT मिनी ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत तीन लाख वीस हजार ते तीन लाख 40 हजार रुपये पर्यंत ठेवण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स यामुळे या ट्रॅक्टरची किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. तसेच महिंद्रा कंपनीने या ट्रॅक्टरला दोन वर्षाची वारंटी देखील दिली आहे.