Tata Punch EMI Calculation:- टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी असून अनेक प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसोबतच प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले वाहने देखील या कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केले जातात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार मॉडेल्स टाटा मोटर्स उत्पादित करते व टाटाच्या कार ग्राहकांमध्ये देखील विशेष लोकप्रिय आहेत.
यामध्ये टाटाची टाटा पंच एक उत्तम अशी कार असून या कारने बरेच ग्राहक आकर्षित केले आहेत. कमी बजेटमधील ही कार आहे व मायलेजच्या बाबतीत देखील ती सर्वात चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील कार घ्यायची असेल व ती ही टाटा पंच तर त्याकरिता तुम्हाला किती डाऊन पेमेंट करावे लागेल व त्यासाठी किती ईएमआय किती कालावधी करिता तुम्हाला भरावा लागेल? याबाबतची माहिती आपण बघू.
टाटा पंचमध्ये काय आहे खास?
जर आपण टाटा पंचची वैशिष्ट्ये बघितली तर यामध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे व ते नॅचरली तीन सिलेंडर इंजिन असून जे 87 एचपी पावर आणि 115 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. इतकेच नाहीतर टाटा मोटर्सने ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील सादर केलेली आहे व एकूण सात प्रकारात ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची सीएनजी एडिशन मायलेजच्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट असून ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यावर किती भरावा लागेल ईएमआय?
टाटा पंचची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत बघितली तर ती 6 लाख 20 हजार रुपये असून रोड टॅक्स आणि इन्शुरन्सची रक्कम जोडल्यानंतर तिची ऑन रोड किंमत जवळपास सात लाख 2 हजार 370 रुपये इतकी होते. यामध्ये जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला एक लाख रुपये डाऊनपेमेंट करावे लागेल व तुम्हाला बँक 6 लाख 23 हजार 760 रुपये लोन देईल. यामध्ये जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर दहा टक्के व्याजदराने हे कर्ज तुम्हाला मिळू शकते. बँकेकडून मिळणारे हे कर्ज जर तुम्ही पाच वर्षांकरिता घेतले तर 60 महिन्यांसाठी तुम्हाला ईएमआय भरावा लागेल व त्याकरिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 13253 रुपयांचा ईएमआय भरणे गरजेचे राहिल.