Maruti 7-Seater Car : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी ग्राहकांना नेहमी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या कार्स ऑफर्स करत असते यामुळे मागच्या अनेक महिन्यांपासून मारुती सुझुकीच्या कार्स देशात विकल्या जाणाऱ्या टॉप 10 कार्सच्या लिस्टमध्ये असतात.
यातच आता पुन्हा एकदा कंपनीने मोठा धमाका करत सर्वात स्वस्त 7-सीटर कारचे तब्बल 10 लाख युनिट्स विकले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात मारुतीची ही सर्वात स्वस्त 7-सीटर कार धुमाकूळ घालत आहे. ही कार खरेदीसाठी बाजारात ग्राहक गर्दी करताना दिसत आहे. चला मग जाणून घेऊया या सर्वात स्वस्त 7-सीटर कारबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही तुम्हाला या लेखात अवघ्या 5.25 लाखात येणाऱ्या सर्वात स्वस्त 7-सीटर कार Maruti Suzuki Eeco बद्दल माहिती देत आहोत . ज्याची बाजारात तब्बल 10 लाख युनिट्स विकले गेले आहे. 7-सीटर कार सेगमेंटमध्ये दमदार मायलेजसह बेस्ट फीचर्स आणि उत्तम लूकमुळे ही कार धमाकूळ घालत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने ही कार पहिल्यांदा भारतीय बाजारात 2010 मध्ये लाँच केली होती.
मारुती सुझुकी इंडियाने नुकतेच आपल्या प्रसिद्ध MPV कार मारुती Eeco चे नवीन अपडेटेड मॉडेल देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.25 लाख रुपये (एक्स-शोरूम,) ठेवण्यात आली आहे. नवीन मारुती ईको कंपनीने नवीन ताजेतवाने इंटीरियर आणि लेटेस्ट फीचर्ससह सादर केली आहे. या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे K-Series Dual-Jet VVT पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते.
मारुती सुझुकी Eeco मध्ये, कंपनीने रिक्लिनिंग फ्रंट सीट, केबिन एअर फिल्टर, डोम लॅम्प आणि नवीन बॅटरी सेव्हिंग फंक्शन समाविष्ट केले आहे. याशिवाय या कारमधील सुरक्षेमध्ये सुधारणा करताना त्यात 11 सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये इल्युमिनिटेड हजार्ड लाइट, ड्युअल एअरबॅग्ज, इंजिन इमोबिलायझर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), चाइल्ड लॉक, स्लाइडिंग डोअर्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इत्यादी उपलब्ध आहेत.
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीयरिंग व्हील, एसी आणि हीटरसाठी रोटरी कंट्रोल केबिनमध्ये किरकोळ सुधारणा आहेत. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटला 60 लीटर बूट स्पेस मिळते. कार 5 रंगांमध्ये ऑफर केली गेली आहे, ज्यात सॉलिड व्हाइट मेटॅलिक सिल्की सिल्व्हर पर्ल मिडनाईट ब्लॅक मेटॅलिक ग्लिस्टेनिंग ग्रे आणि मेटॅलिक ब्रिस्क ब्लू (नवीन रंग) समाविष्ट आहे.
कंपनीचा दावा आहे Eeco पेट्रोल व्हर्जन मागील मॉडेलपेक्षा 25 टक्के अधिक मायलेज देईल. पेट्रोल मोडमध्ये ही कार 19.71 kmpl पर्यंत मायलेज देते. तर CNG व्हर्जन 26. 78 kmpl मायलेज देते.
हे पण वाचा :- Best Recharge Plan : खुशखबर ! ‘ही’ कंपनी देत आहे ग्राहकांना तब्बल 13 महिन्यासाठी Free डेटा आणि कॉलिंग ; असा घ्या लाभ