Maruti Alto 800 : देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी नेहमी ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स आणि बेस्ट मायलेज ऑफर करत राहते. यामुळे मारुती सुझुकी दरमहा देशात सर्वात जास्त कार विक्री करत आहे.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मारुतीची लोकप्रिय कार Maruti Alto 800 चा विक्रीचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. यामुळे कंपनीने एक मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा Maruti Alto 800 बाजारात नवीन अवतारात आणणार आहे.
कमी किमतीत कोणती कार जास्त मायलेज देते? असा प्रश्न विचारल्यास 10 पैकी 9 जण ‘अल्टो’चे नाव घेऊन उत्तर देतील. स्मॉल साइज , चांगले मायलेज, कमी मेंटन्स आणि कमी खर्चामुळे या कारने भारतात फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली.
आज अनेक वर्षांनंतरही या कारची मागणी कमी झालेली नाही. आता ही कार नव्या अवतारात दिसणार आहे. येत्या काही दिवसांत मारुती अल्टोचा नवा अवतार रस्त्यावर धावताना पाहायला मिळणार आहे. तुम्हालाही कार घ्यायची असेल तर काही दिवस थांबा आणि आगामी नवीन अल्टो खरेदी करा.
सध्या महागाई वाढली आहे. इंधनाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात प्रत्येकजण असतो. बरेच लोक अल्टोच्या मायलेज फीचर्समुळे खरेदी करतात. आगामी अल्टोचे मायलेज पूर्वीपेक्षा जास्त असेल. त्याचे सीएनजी व्हेरियंट 30 पेक्षा जास्त मायलेज देईल आणि या एकाच फीचर्समुळे, कारची विक्री खूप जास्त असेल.
कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास नवीन अल्टोची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. या कारमध्ये मेड्रिव्हर एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), स्पीड अलर्ट, फ्रंट सीटबेल्ट रिपीटर आणि रिव्हर्स पार्किंग यांसारखी अनेक फीचर्स मिळणार आहे.
हे पण वाचा :- Unmarried Couple : अविवाहित जोडप्याला पोलीस अटक करू शकते का ? जाणून घ्या काय आहे नियम