ऑटोमोबाईल

आनंदाची बातमी ! 4 लाखाची मारुती अल्टो K10 ‘या’ शोरूमवर फक्त 3.31 लाख रुपयांना मिळतेय, वाचा सविस्तर

Published by
Tejas B Shelar

Maruti Alto K10 : मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये मारुती अल्टो या हॅचबॅक कारचा देखील समावेश होतो. कंपनीने मारुती अल्टो ही गाडी बंद केली आहे मात्र मारुती अल्टो K10 ही गाडी लाँच केली आहे.

मारुती अल्टो K10 या गाडीची लोकप्रियता देखील खूपच अधिक आहे. मध्यमवर्गीय कुटुंब ही गाडी खरेदीला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. या गाडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही गाडी मारुती सुझुकी कंपनीचीच नाही तर देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार आहे.

ही गाडी कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट वर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट म्हणजेच सीएसडी वर वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. या सीएसडी सेंटरवर भारतीय जवानांसाठी कमी किमतीत कार उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

CSD सेंटरवर उपलब्ध असलेल्या गाड्या खरेदी करण्यासाठी जवानांना खूपच कमी जीएसटी भरावा लागतो. यामुळे जवानांना स्वस्तात गाडी खरेदी करता येते. दरम्यान मारुती अल्टो K10 ही गाडी देखील जवानांसाठी सीएसडी सेंटरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या गाडीवर जवानांना फक्त 14 टक्के जीएसटी द्यावा लागतो. सामान्य ग्राहकांना मात्र 28 टक्के जीएसटी द्यावा लागत आहे. म्हणजेच जवानांना जीएसटी मध्ये जवळपास 50% डिस्काउंट मिळत आहे.

शोरूम वर मारुती अल्टो K10 ची बेस मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये एवढी आहे. मात्र सीएसडी सेंटरवर ही गाडी 3.31 लाख रुपयांना मिळते. म्हणजेच मारुती अल्टो K10 च्या बेस मॉडेलवर जवानांना 68 हजार 585 रुपये कमी GST द्यावा लागतो.

दरम्यान, आता आपण मारुती सुझुकीच्या या लोकप्रिय अल्टो K10 च्या सर्व व्हेरियंटच्या शोरूम मधील किमती आणि सीएसडी वरील किमती कशा आहेत ? याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

1.0-लीटर पेट्रोल MT
वॅरियंट शोरूम CSD किंमतीमधला फरक
STD ₹3,99,000 ₹3,30,415 ₹68,585
LXI ₹4,83,500 ₹4,05,296 ₹78,204
VXI ₹5,06,000 ₹4,18,547 ₹87,453
VXI Plus ₹5,35,000 ₹4,44,875 ₹90,125
1.0-लीटर पेट्रोल AMT
वॅरियंट शोरूम CSD किंमतीमधला फरक
VXI ₹5,56,000 ₹4,64,416 ₹91,584
VXI Plus ₹5,85,000 ₹4,90,908 ₹94,092
1.0-लीटर CNG MT
वॅरियंट शोरूम CSD किंमतीमधला फरक
VXI ₹5,96,000 ₹5,04,673 ₹91,327

 

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com