Maruti Brezza Lxi : बंपर ऑफर! अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुतीची ही शक्तिशाली कार, पहा संपूर्ण प्लॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Brezza Lxi : काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीने आपले Maruti Brezza Lxi मॉडेल लाँच केले आहे. एक लिटर पेट्रोलवर 20.15 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच यात अनेक शानदार फीचर्स दिली आहे.

बाजारात या कारला मोठी मागणी आहे. ज्याची किंमत रु. 8,29,000 (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड 9,33,206 रुपयांपर्यंत जाते. परंतु तुमच्याकडे इतके पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही ही कार अवघ्या १ लाखात खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

समजा तुम्हाला ही SUV आवडली असल्यास तर मारुती सुझुकी ब्रेझा खरेदी करण्याचा सोपा फायनान्स प्लॅन पहा. ज्यात तुम्ही ही SUV कमीत कमी डाउन पेमेंटवर सहज खरेदी करू शकता.

किंमत

किमतीचा विचार केला तर मारुती सुझुकी ब्रेझाच्या बेस मॉडेलची किंमत रु. 8,29,000 (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड 9,33,206 रुपयांपर्यंत जाते.

फायनान्स प्लॅनवर येईल खरेदी करता

समजा तुम्हाला ही SUV रोख पेमेंटद्वारे खरेदी करायची असल्यास तुमचे बजेट 9.3 लाख रुपये इतके असावे. परंतु जर तुमचे इतके मोठे बजेट नसेल, तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे ही SUV 1 लाख रुपायांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येईल.

समजा तुमचे बजेट 1 लाख रुपये असेल तर, ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँकेकडून या आधारावर तुम्हाला 8,33,206 रुपयांचे कर्ज मिळू शकते. ज्यावर वार्षिक 9.8 टक्के व्याज आकारण्यात येत आहे.

तर एकदा कर्ज मंजूर झाले तर, तुम्हाला मारुती सुझुकी ब्रेझाच्या बेस मॉडेलसाठी रु. 1 लाख डाउन पेमेंट करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17,621 रुपयांचा मासिक EMI भरावा लागणार आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन

मारुती सुझुकीची ब्रेझा 1462 सीसी इंजिनद्वारे समर्थित असून जी तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनसह खरेदी करू शकता. हे इंजिन 101.65 bhp ची कमाल पॉवर आणि 136.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल.

मायलेज

मायलेजबाबत कंपनीचा असा दावा आहे की मारुती ब्रेझा एक लिटर पेट्रोलवर 20.15 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

जाणून घ्या फीचर्स

मारुती सुझुकी ब्रेझा मध्ये असणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचे तर, कंपनीच्या या कारमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर रीअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत.