7 Seater Car:- प्रत्येकाला स्वतःची कार असावी इच्छा असते व त्यासाठी बरेचजण प्रयत्न करताना देखील दिसून येतात. कोणताही व्यक्ती कार घेण्याचा विचार करतो तेव्हा तो कोणत्या उद्दिष्टाने कार घेणार आहे या अनुषंगाने कारची निवड करत असतो.
यामध्ये बरेच व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी कार घेताना कुटुंबातील सदस्य संख्या विचारात घेऊन कारची निवड करण्याला प्राधान्य प्रामुख्याने दिले जाते. तर मग जर कुटुंबासाठी तुम्हाला कार घ्यायची असेल तर सात सीटर कार घेण्याचा विचार केला जातो.
यामध्ये आपल्या बजेटमध्ये किंवा आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये चांगली मायलेज आणि उत्कृष्ट वैशिष्ट्य असणारी कार मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. जर आपण भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर सध्या एसयूव्ही कारची मागणी वाढलेली आहेस
परंतु त्यासोबत सात सीटर कारची मागणीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची स्थिती आहे. मोठे कुटुंब असेल आणि बऱ्याचदा एकत्र प्रवास करत असाल तर अशी व्यक्ती मोठी कार घेण्याचा विचार करते व या 7 सीटर कार च्या सेगमेंटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतात.
यामध्ये अनेक कंपन्यांच्या कार असून या लेखात आपण मारुतीच्या एका सात सीटर कारबद्दल माहिती घेणार आहोत. जी कार उत्तम मायलेजही देते आणि परवडणाऱ्या अशा किमतीमध्ये देखील उपलब्ध होते.
ही आहे भारतीय बाजारात सर्वात जास्त विकली जाणारी मारुतीची 7 सीटर कार
आपण या लेखात मारुतीच्या अशा कार बद्दल माहिती घेणार आहोत त्या कारला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. ही कार म्हणजे मारुतीची मारुती एर्टिगा ही होय. या कारची किंमत तसेच फीचर्स व मायलेज मुळे ही लोकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे.
या कारचे पेट्रोल मॉडेल 20.51 Kmpl इतके मायलेज देते तर सीएनजी सह ही कार 26.1 कीमी प्रति किलो इतक मायलेज देते. कंपनीने या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन दिले असून जे माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.
या कारची इंजिन 103 पीएस पावर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर गिअर बॉक्सचे पर्याय देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग,
इबिडी सह एबीएस, isofix चाइल्ड सीट अँकर आणि रिवर्स पार्किंग सेन्सर्स देण्यात आले आहेत. तसेच प्रोजेक्टर हेडलँप्स, फॉग लॅम्प, एलईडी टेल लॅम्पस, 15 इंची चाके तसेच सात इंच इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. तसेच या कारमध्ये व्हेंटिलेटर फ्रंट कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर देखील देण्यात आली आहे.
किती आहे या कारची किंमत?
जर आपण मारुतीच्या ईरटीगा कारच्या किमतीचा विचार केला तर ती आठ लाख 64 हजारापासून ते 13 लाख 8 हजार रुपये पर्यंत( एक्स शोरूम ) इतकी आहे तर या कारचे सीएनजी प्रकाराची किंमत ही दहा लाख 73 हजार ते अकरा लाख 83 हजार रुपये इतकी आहे.