Maruti S-Presso : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात 5 लाखाच्या आत किंमत असणारी नवीन कार खरेदी करायची आहे का ? हो ना, मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, भारतीय कार बाजारात ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत काही मोजक्याच गाड्या उपलब्ध आहेत. मध्यमवर्गीयांमध्ये पाच लाखांच्या आत किंमत असणाऱ्या गाड्यांची मोठी मागणी असते.
हेच कारण आहे की काही कंपन्यांनी या सेगमेंट मध्येही आपल्या कार लाँच केल्या आहेत. यामध्ये मारूती सुझुकीच्या कार्स देखील येतात. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीने लो रेंज मध्ये म्हणजे 5 लाखाच्या आत देखील कार उपलब्ध केल्या आहेत.
मारुती सुझूकी एस-प्रेसो या गाडीचा पाच लाखाच्या आतील गाड्यांमध्ये समावेश होतो. जर तुम्हाला मारुती सुझुकीची ही स्वस्त गाडी खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
कारण की, आज आपण ही गाडी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर कितीचा हफ्ता भरावा लागणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
जर तुम्ही ही गाडी घेणार असाल आणि तुमच्याकडे एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम असेल तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल ? हे आता आपण थोडक्यात समजून घेऊया.
मारुती S-Presso ची किंमत ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मारुती S-Presso चे बेस व्हेरिएंट STD ची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये एवढी आहे. ही कार दिल्लीत खरेदी केल्यास सुमारे 18 हजार रुपये आरटीओसाठी आणि सुमारे 20 हजार रुपये विम्यासाठी आणि 5485 रुपये फास्टॅग, एमसीडी आणि स्मार्ट कार्डसाठी भरावे लागतील.
म्हणजे मारुती S-Presso STD ची ऑन रोड प्राईस सुमारे 4.70 लाख रुपये एवढी राहणार आहे. पण, मुंबईत या गाडीची ऑन रोड प्राईस ५.०४ लाख रुपये एवढी आहे.
1 लाख डाउनपेमेंट भरल्यास कितीचा हप्ता द्यावा लागणार
जर तुम्ही याची बेस व्हेरियंट कार विकत घेतली तर बँकेकडून केवळ एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत, 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 3.70 लाख रुपयांचे वित्तपुरवठा करावे लागेल.
जर बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 3.70 लाख रुपये दिले तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 5957 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. या 7 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहे.