Maruti Suzuki ‌Brezza आता मिळत आहे फक्त 2 लाखात, खरेदीसाठी लागल्या रांगा; पहा संपूर्ण ऑफर


तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Brezza ची एक्स-शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 14.14 लाख रुपये मोजावे लागतात. 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki ‌Brezza : देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची Maruti Brezza सध्या बाजारात राज्य करत आहे. उत्तम फीचर्स, जास्त स्पेस आणि बेस्ट मायलेजमुळे ही कार बाजारात धुमाकूळ घालत आहे.

यातच आता या कारवर एक भन्नाट फायनान्स जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा ही कार खरेदीसाठी बाजारात रांगा लागल्या आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Brezza ची एक्स-शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 14.14 लाख रुपये मोजावे लागतात.

बाजारात ही कार  LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिम लेव्हलवर 15 व्हेरियंटमध्ये विकली जाते. या एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये आहे.

Brezza चे CNG मॉडेल्स देखील आहेत. Brezza च्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 20.15kmpl पर्यंत आहे आणि CNG व्हेरियंटचे मायलेज 25.51km/kg पर्यंत आहे. आजच या लेखात आम्ही तुम्हाला  Brezza ZXI आणि Brezza ZXI Plus व्हेरियंटचे वित्त तपशील सांगणार आहो ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्तात Maruti Suzuki ‌Brezza खरेदी करू शकतात.

Maruti Suzuki ‌Brezza ZXI Loan EMI Option

मारुती ब्रेझाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेलपैकी एक, Brezza ZXI ची किंमत रु.11.04 लाख एक्स-शोरूम आणि रु.12,79,398 ऑन-रोड किंमत आहे. जर तुम्ही मारुती ब्रेझा ZXI ला 2 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटनंतर फायनान्स केले तर तुम्हाला 10,79,398 रुपये कर्जाची रक्कम मिळेल.

कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे आणि व्याज दर 9% आहे, नंतर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी ईएमआय म्हणून 22,407 रुपये द्यावे लागतील. वरील अटींनुसार Brezza ZXI व्हेरियंटला वित्तपुरवठा केल्यावर तुम्हाला सुमारे रु. 2.65 लाख व्याज द्यावे लागेल.

Brezza-2022

Maruti Suzuki ‌Brezza ZXI Plus Loan EMI Option

Maruti Suzuki Brezza SUV चे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल, Brezza ZXI Plus ची एक्स-शोरूम किंमत रु. 12.48 लाख आणि ऑन-रोड किंमत रु. 14,43,964 आहे. जर तुम्ही मारुती ब्रेझा ZXI प्लस मॉडेलला 2 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटनंतर फायनान्स केले तर तुम्हाला 12,43,964 रुपये कर्जाची रक्कम मिळेल.

जर तुम्ही 9% व्याज दराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी 25,823 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. वरील अटींनुसार Brezza ZXI Plus प्रकाराला वित्तपुरवठा केल्यावर तुम्हाला रु. 3 लाखांपेक्षा जास्त व्याज लागेल.

हे पण वाचा :-   Ration Card: रेशनकार्ड धारकांना धक्का! नव्या यादीत ‘या’ लोकांची नावे होणार कट; जाणून घ्या नेमकं कारण