ऑटोमोबाईल

Maruti Suzuki Cars Offer : त्वरा करा… ऑफर मर्यादित दिवसांसाठीच! मारुती कार खरेदीवर ५४ हजार रुपयांचा डिस्काउंट, ऑफरमध्ये ४ कारचा समावेश

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Suzuki Cars Offer : मारुती सुझुकी ही देशातील ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. तसेच मारुती सुझुकी कार विक्रीच्या बाबतीत नेहमी अव्वल स्थानी असलेली कंपनी आहे. दरवर्षी मारुती सुझुकीच्या लाखो कार विकल्या जातात.

जर तुम्हीही ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्यदिना दिवशी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे.

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कारवर मोठी सवलत दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही ३१ ऑगस्टपर्यंत मारुती सुझुकीची कार खरेदी करून तुम्हीही बंपर बचत करू शकता.

खालील कारवर कंपनीकडून ऑफर देण्यात येत आहे

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची लोकप्रिय कार अल्टो K10 वर देखील 54,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. अल्टो K10 पेट्रोल MT व्हेरियंट 20,000 हजार रुपयांची रोख सूट, AMT व्हेरियंटवर 20,000 रुपयांची रोख सूट आणि सीएनजी व्हेरियंटवर 20,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच या कारवर एक्सचेंज बोनस म्हणून 15,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच अल्टो K10 पेट्रोल मॉडेलवर 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारच्या Vxi MT, Vxi+ MT ये व्हेरियंटवर 35,000 रोख सवलत दिली जात आहे. तसेच एस-प्रेसो AMT या व्हेरियंटवर 30,000 रोख सवलत आणि सीएनजी मॉडेलवर 35,000 रोख सवलत दिली जात आहे. तसेच कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. कारवर एकूण 54,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी Eeco

मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय असलेली ७ सीटर कार Eeco वर देखील ३१ ऑगस्टपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. या कारवर एकूण 29,000 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. या कारच्या सीएनजी मॉडेलवर देखील 10,000 रुपये एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वॅगन आर कारवर 54,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. कारवर 25,000 रोख सवलत दिली जात आहे. तसेच 20,000 एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. तसेच इतर सवलती देखील दिल्या जात आहेत.

Ahmednagarlive24 Office