ऑटोमोबाईल

Maruti Ertiga Cruise: मारुतीने लॉन्च केली नवीन हायब्रीड कार! लूक आणि मायलेज पहाल तर व्हाल थक्क, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Maruti Ertiga Cruise:- भारतामध्ये अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये अनेक वर्षापासून जर आपण एक नाव पाहिले तर मारुती सुझुकी कायम प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आजपर्यंत या कंपनीने सर्वसामान्य भारतीयांना देखील कारचे स्वप्न पूर्ण करता येईल अशा परवडणारे किमतीमध्ये अनेक कारची निर्मिती केलेली आहे. आज आपण ग्रामीण भारताचा जरी विचार केला तरी आपण कार म्हटले म्हणजे पटकन तोंडामध्ये मारुती हे नाव अगोदर येते.

यावरून आपल्याला या कंपनीची प्रसिद्धी आणि ग्राहकांमध्ये असलेली पसंती दिसून येते. अशा पद्धतीने प्रसिद्ध असलेल्या मारुती सुझुकीने नवीन एर्टिगा क्रूज हायब्रीड कार लॉन्च केली असून या नवीन एमपीव्ही

मध्ये कंपनीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण मोठ्या स्वरूपाचे बदल करण्यात आलेले आहेत. याच नवीन एरटिगा क्रूझ हायब्रीड कार बद्दलची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघू.

 मारुती एर्टिगा क्रुझ कारची वैशिष्ट्ये

 मारुती सुझुकीच्या माध्यमातून नवीन ईरटीगा क्रुझ हायब्रीड कार लॉन्च करण्यात आलेली असून कंपनीच्या माध्यमातून या एमपीव्हीमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये एक्सटेरियर आणि इंटेरियर बदलासोबतच एक पावरफुल बॅटरी देखील कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

सध्या मारुतीने ही नवीन एर्टिगा दोन रंगांमध्ये सादर केली आहे. यातील पहिला म्हणजे पियर व्हाईट प्लस कुल ब्लॅक ड्युअल टोन आणि दुसरा म्हणजे इंटेन्सिफाइड कुल ब्लॅक कलर हे होय. मारुती एर्टिगा क्रुझ ही हायब्रीड एडिशन असून यामध्ये पेट्रोल आणि सीएनजी कारपेक्षा फ्युएल एफिशियन्सी मध्ये स्वस्त आहे.

तसेच तुम्हाला मारुती एरटिगा क्रूज हायब्रीड व्हर्जनमध्ये स्पोर्टी लूक देखील मिळेल. या कारच्या इंटेरियर डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. या एमपीव्हीमध्ये 17.78 सेंटीमीटर स्मार्ट प्ले प्रो टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Arkamys साऊंड सिस्टम,

अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक  क्लाइमेट कंट्रोल,पुश बटन स्टार्ट, स्टेरिंग माउंटेन कंट्रोल आणि 360 व्ह्यू डिग्री कॅमेरा यामध्ये देण्यात आलेला आहे.

आपण बाहेरील बदल पाहिले तर यामध्ये स्पोर्टी फ्रंट बंपर, साईड अंडर स्पॉयलर, रियर अप्पर स्पॉयलर, स्पोर्टी रिअर बंपर विथ अंडर स्पॉयलर, 16 इंच आलोय वेहिकल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि फ्रंट फॉग लॅम्प देण्यात आलेले आहे.

 या नवीन एर्टिगा हायब्रीड कारचे इंजिन

 या नवीन इर्टिगामध्ये माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी सह 1.5 लिटर K15B पेट्रोल इंजन असून जे 103 पीएस पावर आणि 138 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या एमपीव्हीमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आली आहे. नवीन एर्टिगा प्रतिलिटर 20 किलोमीटरचे मायलेज देते.

 किती आहे या कारची किंमत?

 सध्या ही कार इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आली असून तिची किंमत भारतीय चलनानुसार पंधरा लाख तीन हजार रुपये( एक्स शोरूम) इतकी आहे तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत भारतीय चलनात 16 लाख रुपये आहे. भारतामध्ये या वर्षाच्या शेवटपर्यंत ही कार लॉन्च होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ajay Patil