मारुती सुझुकीची स्विफ्ट नवीन अवतारात आली…! कशी आहे 4th जनरेशन स्विफ्ट? किंमत अन फिचर्सची यादी पहा….

Tejas B Shelar
Published:
Maruti Suzuki New Swift

Maruti Suzuki New Swift : नजिकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी अर्थातच मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय कारचे फोर्थ जनरेशन मॉडेल लॉन्च केले आहे.

मारुती सुझुकीने स्विफ्ट या लोकप्रिय कारचे 4th Generation मॉडेल अधिकृत रित्या लॉन्च केले आहे. खरे तर या गाडीची बुकिंग आधीपासूनच सुरू आहे. दरम्यान आता ही गाडी अधिकृत रित्या लॉन्च करण्यात आली आहे.

ही नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट पहिल्यांदा जपान येथील मोबिलिटी शोमध्ये दिसली होती. तेव्हाच ही गाडी लवकरच भारतीय कार बाजारात देखील लॉन्च होणार अस स्पष्ट झालं होत. यानुसार ही गाडी आता भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. खरे तर स्विफ्ट ही भारतीय बाजारात एक लोकप्रिय कार ठरली आहे.

या गाडीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र ही गाडी नजरेस पडते. आतापर्यंत या गाडीचे तीन जनरेशनचे मॉडेल बाजारात दाखल झाले होते. आता या गाडीचे चौथ्या जनरेशनचे मॉडेल देखील लॉन्च झाले आहे. तसेच याची बुकिंगही सुरू असून ज्यांना ही गाडी खरेदी करायची असेल त्यांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळील डीलरकडे जाऊन ही गाडी बुक करता येणार आहे.

आतापर्यंत या गाडीच्या सर्वच जनरेशनच्या मॉडेलला ग्राहकांची पसंती मिळाली असून या देखील मॉडेलला पसंती मिळणार असे म्हटले जात आहे. यामुळे आज आपण या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीचे फीचर्स कसे आहेत आणि याची किंमत काय आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किंमत किती आहे

ही गाडी ग्राहकांना परवडेल अशा किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही 6.5 लाख रुपये एवढी आहे. तसेच या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही नऊ लाख 64 हजार 500 रुपये एवढी आहे. या गाडीचे बेस व्हेरिएंट हे फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध होते.

बाकी सर्व व्हेरिएंट हे ऑटोमॅटिक गेअर सिस्टम सोबत जोडलेले आहेत. ही गाडी LXi, VXi, VXi (O), ZXi, ZXi+ आणि ZXi+ Dual Tone अशा एकूण 6 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. सर्वात महाग स्विफ्ट व्हेरिएंट हा ZXi+ AT आहे ज्याची किंमत रु. 9.65 लाख एक्स शोरूम एवढी आहे.

डिझाईन कसे आहे

गाडीच्या डिझाईन मध्ये कोणताच बदल झालेला नाही. पण, या गाडीमध्ये काही एक्स्ट्रा फीचर्स ॲड करण्यात आले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार या नव्याने लॉन्च झालेल्या खुर्द जनरेशन Swift मध्ये नवीन बंपर, नवीन डिझाइनचे रेडिएटर ग्रिल उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर ब्रँड लोगोची जागा चेंज करण्यात आली आहे.

आता लोगो कारच्या फ्रंट बोनटवर दिसत आहे. यात नवीन हेडलँप आणि फॉग-लँप देखील आहेत. जे की कारच्या फ्रंटला दिले आहेत. यामुळे गाडीचे डिझाईन फारसे बदललेले नसले तरी देखील या गाडीला एक फ्रेश लुक मिळाला आहे. विशेष म्हणजे याच्या डायमेन्शन मध्ये देखील महत्त्वाचे बदल झाले आहेत.

या गाडीचा आकार थोडासा वाढवला गेला आहे. ही कार सध्याच्या मॉडलच्या तुलनेत 15 मिमी लांब आणि जवळपास 30 मिमी उंच असल्याचे सांगितले गेले आहे. परंतु या गाडीच्या व्हिलबेस मध्ये कोणताच बदल झालेला नाही.

कंपनीने नवीन स्विफ्टमध्ये मागील दरवाजाच्यावर हँडल हा पारंपारिक पद्धतीचा दिला आहे. तसेच या नवीन गाडीत अलॉय व्हिल अधिक मजबूत देण्यात आले आहेत. ग्राहकांच्या माध्यमातून आधीच्या गाडीत असणाऱ्या अलॉय व्हिल संदर्भात तक्रारी केल्या जात होत्या. यामुळे कंपनीने हे अलॉय व्हिल बदलले आहे.

गाडीचे इंटेरियर कसे आहे

नव्याने लॉन्च झालेल्या गाडीत आधुनिक आणि फ्रेश इंटेरियर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंटरियरला प्रीमियम टच देण्याचा कंपनीचा प्रयत्न दिसत आहे. या गाडीच्या केबिनमध्ये फ्री स्टँडिंग इंफोटेंमेंट सिस्टम, नवी स्टाइलचे सेंटर एयर कॉन वेंट्स आहेत. तसेच नवी अपहोल्स्ट्री आणि नवीन डिझाइनचा डॅशबॉर्डदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गाडीचे इंटिरियर ग्राहकांना आवडतील अशी आशा कंपनीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

इंजिन कसे राहणार

नवीन जनरेशनच्या स्विफ्टच्या इंजिनमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीत नवीन 1.2 लीटरची क्षमता असलेले Z सीरीज इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या इंजिनची 82hpची क्षमता आहे तसेच हे 112 Nmचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मायलेज किती देते 

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही नव्याने लॉन्च झालेली गाडी किती मायलेज देते. कारण की, कंपनीने ही नवीन गाडी आधीच्या गाडीपेक्षा अधिक मायलेज देणार असे म्हटले होते. यानुसार ही नव्याने लॉन्च झालेली गाडी 25.72 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देण्यात सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आधीचे मॉडेल 22 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देत होती मात्र आता नव्याने लॉन्च झालेली ही गाडी त्यापेक्षा अधिक मायलेज देणार आहे.

फिचर्स कसे आहेत 

या गाडीच्या फीचर्स बाबत बोलायचं झालं तर यामध्ये 9 इंचाचा टचस्क्रीन इंन्फोटेंमेट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील भागात AC वेंट्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल असे काही अत्याधुनिक आणि अपडेटेड फिचर्स पाहायला मिळतं आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीच्या सर्व व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग दिल्या जात आहेत. यामुळे ही गाडी ग्राहकांना आवडणार असा कंपनीचा विश्वास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe