ऑटोमोबाईल

Maruti Suzuki Recall Cars: मारुतीने पुन्हा दिला ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात रिकॉल करणार तब्बल 17,362 कार्स ; जाणून घ्या नेमकं कारण

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Suzuki Recall Cars:   तुम्ही देखील मारुती सुझुकीची कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी असणारी मारुती सुझुकीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कंपनी आपल्या तब्बल 17,362 कार्स रिकॉल करणार आहे.त्यामुळे तुम्ही देखील मारुतीची नवीन कार खरेदी करणार असाल तर कंपनी कोणत्या कोणत्या कार्स रिकॉल करणार आहे याची माहिती जाणून घ्या नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कारण काय आहे?

मारुती सुझुकीने आपल्या 17,362 कार्स रिकॉलचे कारण म्हणजे या  कार्सच्या सुरक्षा फीचर्समधील तांत्रिक बिघाड आहे. या कार्सच्या एअरबॅगमध्ये हा दोष आढळून आला आहे. यामुळे मारुती सुझुकी आपल्या 17,362 कार्स रिकॉल  करणार आहे.

कोणती मॉडेल्स रिकॉल होणार

एअरबॅगमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या कंपनीच्या कार्सचे कोणते मॉडेल रिकॉल  केले जाणार आहे याची देखील मारुती सुझुकीने माहिती दिली आहे.

Maruti Suzuki Alto K10

Maruti Suzuki Brezza

 

Maruti Suzuki Baleno

Maruti Suzuki S-Presso

Maruti Suzuki Grand Vitara

Maruti Suzuki Eeco

मारुती सुझुकीने त्यांच्या अधिकृत डीलरशिपना या मॉडेल्सची कार्स रिकॉल  करण्याची सूचना दिली आहे.

माहिती देताना, मारुती सुझुकीने सांगितले की, 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान उत्पादित केलेली कार्स रिकॉल  केली जाणार आहे. या कार्सच्या उत्पादनात एअरबॅगमधील तांत्रिक दोषामुळे वरील मॉडेल्सची 17,362  कार्स  रिकॉल केली जात आहे.

विनामूल्य बदलले जाईल

माहिती देताना मारुती सुझुकीने सांगितले की, एअरबॅगमधील तांत्रिक बिघाडामुळे जी कार्स रिकॉल  केली जाणार आहे ती सर्व कार्स मोफत बदलली जातील. अशा परिस्थितीत या कार्सचा वापर करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च सहन करावा लागणार नाही.

हे पण वाचा :-  Airtel Recharge : बिनधास्त चालवा इंटरनेट ! कंपनी देत आहे ‘इतके’ GB फ्री डेटा ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 Office