देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सुरू असून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आता ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे व हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स तसेच इलेक्ट्रिक कार इत्यादी वाहनांचा आपल्याला समावेश करता येईल. भारतातील आणि जगातील अनेक नामवंत वाहन उत्पादक कंपन्या उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेल्या अनेक बाईक तसेच कार व स्कूटर इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये उत्पादित करत असून लॉन्च देखील करत आहेत.
सध्या भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून नव्या व्हेरियंटमधील अनेक आकर्षक अशा इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आलेल्या आहेत व आता या स्पर्धेमध्ये मारुती सुझुकीने देखील पाऊल ठेवले असून लवकरच आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
विशेष म्हणजे मारुती सुझुकीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात येणारी ही इलेक्ट्रिक कार एसयूव्ही असणार आहे. या कारला दोन नावे निश्चित करण्यात आलेली असून यामध्ये एस्कुडो आणि टॉर्कनाड या दोन नावांचा समावेश आहे व या दोन पैकी एक नाव या कारला दिले जाण्याची शक्यता आहे. या कारबद्दल सांगण्यात येत आहे की ही एकदा चार्ज केल्यानंतर 550 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
कशी असेल या कारची बाहेरील डिझाईन आणि स्टाईल?
या नवीन मारुती सुझुकीचे बाहेरील डिझाईन म्हणजेच एक्सटेरियर उत्कृष्ट असून त्याचा पुढचा भार म्हणजेच पुढचा भाग हा मजबूत बंपरसह येणार असून त्याच्या लोखंडी ग्रीलवर मोठ्या आकाराचा सुझुकीचा लोगो लावण्यात आला आहे. पुढच्या भागांमध्ये एलईडी हेडलॅम्प दिलेले असून एक स्लिक क्रोम बार देखील त्यांना जोडताना आपल्याला दिसून येईल. तसेच या कारला अनेक भागांमध्ये विभागलेले एलइडी डीआरएल असणार असून ते दिसायला खूप आकर्षक आहेत.
कशी असेल साईड प्रोफाईल ?
मारुती सुझुकीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या ईव्हीएक्स इलेक्ट्रिक एसयूचे साईड प्रोफाइल देखील खूप मजबूत आहे. या कारला डायमंड कट मशीन केलेले अलॉय व्हील्स देण्यात आलेले असून जे दिसायला खूप सुंदर आहेत. तसेच या कारचा मागचा भाग वेगवेगळ्या लेव्हलचा बनवण्यात आला असून भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक कारनुसार त्याची रचना करण्यात आलेली आहे.
तसेच मागच्या बाजूला एलईडी टेललॅम्प देण्यात आलेले असून हा संपूर्ण भाग एलईडी बारने देखील जोडण्यात आलेला आहे. तसेच मोठ्या आकाराचा सुझुकीचा लोगो देण्यात आला आहे व त्याखाली ईव्हीएक्स असे लिहिलेले असल्याने त्यामुळे या भागाला एक वेगळेपण असल्याचे दिसून येते.