Maruti Suzuki New Car : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय कार निर्माती कंपनी आहे. ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे.
दरम्यान जर तुम्हीही मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची सेव्हन सीटर कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी खास राहणार आहे.
कारण की कंपनी लवकरच एक नवीन सेव्हन सीटर कार बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे नव्याने लॉन्च होणारी ही गाडी कंपनीच्या लोकप्रिय मारुती सुझुकी एर्टिगा या गाडीपेक्षा स्वस्त राहणार आहे.
यामुळे ज्यांना स्वस्तात सेव्हन सीटर गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा पर्याय बेस्ट ठरू शकतो. गाडीवाडी या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सदर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मारुती सुझुकीची ही अपकमिंग सेव्हन सीटर कारचा कोडनेम YDB राहणार आहे.
ही कार जपानमध्ये विक्री होणाऱ्या सुझुकी स्पेसियाच्या धर्तीवर तयार केली जाणार आहे. मात्र या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीमध्ये अनेक मूलभूत बदल केले जातील अशी शक्यता आहे.
दरम्यान, आता आपण या अपकमिंग गाडीमध्ये नेमके काय खास राहणार याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
नव्याने लॉन्च होणार्या सेव्हन सीटरच्या विशेषता
मारुती सुझुकीची ही अपकमिंग सेव्हन सीटर कार भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 7 सीटर मारुती अर्टिगापेक्षा स्वस्त राहण्याची शक्यता आहे.
आगामी MPV ची किंमत मारुती Ertiga पेक्षा कमी असेल, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. दुसरीकडे, कंपनी आपल्या Nexa डीलरशिपद्वारे त्याची विक्री करणार अशा देखील चर्चा सुरू आहेत.
पण, मारुती एर्टिगा नियमित एरिना डीलरशिपद्वारे पाठवली जाते. कंपनी आगामी 7 सीटर एमपीव्ही हायब्रिड आवृत्तीमध्ये लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे.
असे झाल्यास, आगामी MPV ही 35 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम राहणार असे बोलले जात आहे.
या कारमध्ये झेड सीरीज 1.2 लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिन वापरले जाईल असे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये नमूद करण्यात आले आहे.