मोठी बातमी ! मारुती सुझुकी लवकरात लॉन्च करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, कसे राहणार फिचर्स ? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेट्रोल डिझेल यांच्या वाढलेल्या किमती पाहता आता इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात मोठी मागणी आली आहे. विशेष म्हणजे वाढते प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलच्या आयातीचा सरकारवर वाढत असलेला दबाव या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्र शासनाने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. याचा परिणाम म्हणून देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे.

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक्स मोठ्या प्रमाणात आता पाहायला मिळत आहेत. मात्र असे असले तरी इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बाइक्स अजूनही इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत फारच कमी पाहायला मिळतात. परंतु इलेक्ट्रिक कार हळूहळू बाजारात आपला दबदबा बनवत आहे.

अशातच आता मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात लॉन्च करणार आहे. दरम्यान आज आपण कंपनीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या विशेषता अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षीच्या अखेरीस जपान येथील मोबिलिटी शोमध्ये स्पॉट झाली होती. यानंतर कंपनीने या पहिल्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग देखील सुरू केली आहे. आत्तापर्यंत मारुती सुझुकीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारची अर्थातच ईव्हीएक्स eVX ची टेस्टिंग विदेशात झाली आहे. पण आता या गाडीची पहिल्यांदाच भारतात टेस्टिंग करण्यात आली आहे. यामुळे लवकरच मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे.

कसे राहणार डिझाईन ?

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी eVX चे डिझाईन हे कॉन्सेप्ट मॉडेलच्या तुलनेत खूप वेगळे असेल. त्याच्या मागील बाजूस संपूर्ण रुंदी कव्हर करणाऱ्या हॉरिजन्टल एलईडी लाइट बार असतील. याला हाय-माउंट स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना आणि स्लो अँटेना मिळणार आहे.

त्याच्या बाहेरील भागाबद्दल बोलायचे झाल्यास, याला एक रेक्ड फ्रंट विंडशील्ड, स्क्वेअर-ऑफ व्हील आणि वॉर्पच्या आत लपलेले मस्क्यूलर साइड क्लेडिंग मिळते. यात 17-इंच अलॉय व्हील्स मिळतील. या कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची लांबी अंदाजे 4,300 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,600 मिमी राहील असा अंदाज आहे.

एकदा रिचार्ज केल्यास किती किलोमीटर चालणार

मीडिया रिपोर्टनुसार, मारुती सुझुकीची eVX सिंगल आणि ड्युअल-इलेक्ट्रिक मोटर सेटअप दोन्हीमध्ये उपलब्ध राहणार असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला आहे. ही कंपनीची पहिली-वहिली इलेक्ट्रिक कार युरोप आणि जपान सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी राखीव राहणार असे बोलले जात आहे. eVX मध्ये 60 kWh Li-ion बॅटरी पॅकसह बाजारात लाँच होणार आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमी पर्यंत धावणार अशी माहिती समोर आली आहे.