ऑटोमोबाईल

मारुती सुझुकीची ‘ही’ जबरदस्त मायलेज देणारी एसयूव्ही कार झाली महाग ! पहा…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Suzuki Car Price Hike : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या SUV कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.

दरम्यान, कंपनीने आपल्या एका लोकप्रिय एसयूव्ही कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनीने ग्रँड विटारा या लोकप्रिय कारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात ग्रँड विटारा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आता अधिकचा खर्च करावा लागणार आहे.

ग्रँड विटाराची किंमत किती वाढली :- Delta Smart Hybrid AT, Zeta Smart Hybrid AT, Alpha Smart Hybrid AT आणि Alpha Dual-Tone Smart Hybrid AT या मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. म्हणजेच या व्हेरिएंटच्या किमती बदललेल्या नाहीत.

मात्र या कारच्या इतर सर्व व्हेरिएंटच्या किमती 10,000 रुपयांनी वाढल्या आहेत. यामुळे आता ही लोकप्रिय कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. या नवीन किमती अपडेट झाल्यानंतर या कारची किंमत 10.80 लाख रुपयांपासून ते 20.09 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

मात्र या कारची किंमत वाढवण्यात आली असली तरी देखील या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे. या चालू महिन्यात अर्थातच फेब्रुवारी 2024 मध्ये या कारवर 75 हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर कंपनीकडून दिला जात आहे. मात्र ही ऑफर केवळ या महिन्यासाठीच मर्यादित राहणार आहे.

नंतर मात्र ग्राहकांना वाढीव किमतीत ही कार खरेदी करावी लागणार आहे. यामुळे पुढल्या महिन्यापासून ही कार खरेदी करणे आधीच्या तुलनेत आणखी महाग होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जर ही गाडी खरेदी करायची असेल तर या महिन्यातच ही कार खरेदी करावे लागेल जेणेकरून त्यांचे पैसे वाचू शकतील.

Ahmednagarlive24 Office