Maruti Suzuki SUV Car Price Hike : एसयूव्ही कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारात एसयूव्ही कारला मोठी मागणी आली आहे. एसयूव्ही कार तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या एसयुव्ही गाड्या देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनल्या आहेत.
अशातच आता मारुती सुझुकीने आपल्या एका लोकप्रिय SUV कारच्या किमतीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने Brezza या आपल्या लोकप्रिय SUV च्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे आता Brezza कार खरेदी करणे महाग होणार आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही मारुती सुझुकीची ही लोकप्रिय एसयुव्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की आज आपण कंपनीने Brezza च्या जाहीर केलेल्या अपडेटेड किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती रुपयांनी वाढल्यात किंमती
मारुती सुझुकीची Brezza ही कार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीने मारुती सुझुकी Brezza च्या किमती 10,000 रुपयांनी वाढवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या लोकप्रिय कारच्या ZXi, ZXi ड्युअल-टोन, ZXi CNG, ZXi CNG ड्युअल-टोन, ZXi+ आणि ZXi+ O ड्युअल-टोन प्रकारांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण, या लोकप्रिय कारच्या ZXi AT, ZXi AT Dual-Tone, ZXi+ AT आणि ZXi+ AT ड्युअल-टोन सारख्या निवडक प्रकारांच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
याशिवाय कंपनीच्या माध्यमातून या लोकप्रिय कारच्या VXi AT या व्हेरियंटच्या किमती 5000 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. मारुती सुझुकीच्या या एसयूव्हीच्या LXI, LXI CNG, VXi आणि VXi CNG व्हेरियंटच्या किमतीत 5,000 रुपयांची एकसमान वाढ करण्यात आली आहे.
यामुळे आता मारुती सुझुकी Brezza या कारच्या किमती 8.34 लाखापासून सुरू होणार आहेत आणि 14.14 लाख रुपयांपर्यंत जाणार आहेत. दरम्यान या सर्व किमती एक्स शोरूम राहणार आहेत. म्हणजेच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार याची नोंद ग्राहकांनी घ्यायची आहे.