Maruti WagonR ZXI Plus : सोडू नका अशी भन्नाट संधी! अवघ्या 1 लाखात खरेदी करा मारुतीची शक्तिशाली कार, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti WagonR ZXI Plus : काही महिन्यांपूर्वी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन कार खरेदी कराव्या लागत आहेत. किंमत वाढल्याने त्यांच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपली WagonR ZXI Plus लाँच केली होती.

जी तुम्ही आता अवघ्या 1 लाखात घरी आणू शकता. कंपनीच्या या कारमध्ये तुम्हाला शानदार मायलेज मिळेल. तसेच तुम्हाला शक्तीशाली इंजिनही मिळेल. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

स्वस्तात खरेदी करा मारुती सुझुकी WagonR ZXI

किमतीचा विचार केला तर Maruti Suzuki WagonR ZXI प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 6.28 लाख रुपये इतकी आहे तर ऑन-रोड किंमत 7,13,379 इतकी रुपये आहे. परंतु जर तुमच्याकडे इतके पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही WagonR ZXI मॅन्युअल पेट्रोल मॉडेलला 1 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला 6,13,379 रुपये कर्जाची रक्कम मिळू शकते.

ज्याचा कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे तर या कर्जावरील व्याज दर 9% इतका आहे. तसेच तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 12,733 रुपये EMI म्हणजेच मासिक हप्ता भरावा लागणार आहे. मारुती वॅगनआरच्या या प्रकाराला तुम्ही फायनान्स केला तर तुम्हाला 5 वर्षांत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागणार आहेत.

अशाप्रकारे स्वस्तात खरेदी करा मारुती सुझुकी वॅगनआर ZXI प्लस

किमतीचा विचार केला तर Maruti Suzuki WagonR ZXI Plus मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.75 लाख रुपये इतकी आहे तर ऑन-रोड किंमत 7,65,680 रुपये इतकी आहे. समजा तुम्ही मारुती वॅगनआरच्या टॉप सेलिंग व्हेरिएंटला 1 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला 6,65,680 रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे.

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर, तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 13,818 हप्ते भरावे लागणार आहेत. हे लक्षात ठेवा की मारुती सुझुकी वॅगनआर ZXI प्लस व्हेरियंटसाठी 5 वर्षांच्या कालावधीत 1.63 लाख रुपयांहून अधिक व्याज मिळेल.