भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये मारुतीची धमाकेदार इंट्री! लवकरच येत आहे मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार eVitara; जाणून घ्या फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Suzuki E-Vitara:- भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये सध्या आणि कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जात असून काही इलेक्ट्रिक कार येणाऱ्या दिवसात सादर केल्या जाणार आहेत.

कार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने देखील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टिझर रिलीज केला असून कंपनीच्या या एसयूव्हीचे नाव ई- विटारा असणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये कंपनीच्या माध्यमातून ही कार सादर केली जाणार आहे.

साधारणपणे हा एक्सपो 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणार आहे. बाजारपेठेतील इतर इलेक्ट्रिक कारच्या दृष्टीने बघितले तर मारुतीची ही इलेक्ट्रिक कार येणाऱ्या ह्युंदाई क्रेटा ईव्हीशी स्पर्धा करेल असे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या या कारचे फोटो वरून एक अंदाज लावता येऊ शकतो की, या कारचे स्वरूप कसे असू शकते.

मिलान या ठिकाणी आयोजित EICMA 2024 मध्ये नवीन सुझुकी ई विटाराचे अनावरण करण्यात आले होते. जर आपण या कारचे डिझाईन बघितले तर त्यानुसार चारही बाजूंनी जाड क्लेडिंग, चंकी व्हील आर्च, वाय आकाराचे एलईडी हेडलॅम्प, कनेक्टेड टेललॅम्प आणि मागच्या बाजूचे बंपर जाड आहेत.तसेच चार्जिंग पोर्ट हा समोरच्या डाव्या फेंडरवर इन्स्टॉल केला असून मागच्या दरवाजाच्या हँडल्स हे सी पिलर वर इन्स्टॉल केले आहेत.

कसे असेल या कारचे इंटेरियर?

या कारचे इंटरियर जर बघितले तर या कार मध्ये ड्युअल डॅशबोर्ड स्क्रीन, वायरलेस चार्जर तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा तसेच ऑटो होल्ड फंक्शन सोबत इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 ADAS उपलब्ध असणार आहे.

कसे असणार कारमध्ये बॅटरी पॅक?

मारुतीच्या या ई विटारा या इलेक्ट्रिक कार मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय देण्यात येणार आहेत व यामध्ये एक 49kWh क्षमतेचा आणि दुसरा 61kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असणार आहे. यामध्ये पूर्वीचे फक्त दोन व्हील ड्राईव्ह कॉन्फिगरेशन मध्ये ऑफर केली जाणार आहे व नंतरच्या दोन ड्राईव्ह ट्रेन दोन व्हील ड्राईव्ह आणि चार व्हील ड्राईव्ह मध्ये मिळणार आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe