ऑटोमोबाईल

Maruti Celerio : 2 रुपयात 1 KM धावते ‘ही’ मारुतीची स्वस्त कार ! सध्या मिळतोय 68 हजारांचा डिस्काउंट

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Celerio : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून इंधनाचे भाव चांगलेच वाढत आहेत. अशावेळी कारचा रनिंग कॉस्ट कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्त मायलेज देणारी कार वापरणे.

डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा जास्त मायलेज देतात. व डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त देखील आहे. सीएनजी कार तर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही कारपेक्षा जास्त मायलेज देते. विशेष म्हणजे सीएनजी कार या दोन्ही कारपेक्षा स्वस्त आहेत.

म्हणजेच सीएनजी कारची रनिंग कॉस्ट कमी असेल. म्हणजेच जर आपण सर्वाधिक मायलेज देणारी सीएनजी कार खरेदी केल्यास सध्याच्या महागाईच्या जमान्यात परवडणारी ठरेल.

मारुती सुझुकीकडे अशी एक कार आहे, के जे तुम्हाला महागाईत दिलासा देण्याचे काम करेल. मारुती सुझुकी सेलेरियो ही सीएनजीवरील सर्वात पॉवरफुल कार आहे. ही कार सीएनजीवर 35.6 किलोमीटर प्रति किलोमायलेज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

दिल्लीत सीएनजी ७४ रुपये किलोदराने विकले जाते. या दरानुसार मारुती सेलेरियो सीएनजी व्हेरियंट चालवण्यासाठी केवळ २ रुपये प्रति किलोमीटर खर्च येईल.

किंमत

मारुती सेलेरियोची किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.14 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. सीएनजी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, परंतु या महिन्यात (ऑक्टोबर 2023) त्याच्या सीएनजी व्हेरियंटवर 68,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तथापि, आपल्याला डीलरशिपकडे याची पुष्टी करावी लागेल कारण ते डीलरशिप आणि स्थानानुसार बदलू शकते.

इंजिन आणि फीचर्स

यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गियरबॉक्सचा पर्याय आहे. सेलेरियो सीएनजी मध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. यात 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, पॅसिव्ह कीलेस एंट्री, स्टीअरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल आणि असे बरेच अत्याधुनिक फिकेचर्स देण्यात आले आहेत.

Ahmednagarlive24 Office