Maruti Suzuki Cars : मध्यमवर्गीयांसाठी मारुतीची खास ऑफर, ‘या’ गाड्यांवर हजारो रुपयांची सूट…

Content Team
Published:
Maruti Suzuki Cars

Maruti Suzuki Cars : जर तुमचा आता कार खरेदीचा विचार असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या देशातील आघाडीची ऑटो कपंनी आपल्या काही गाड्यांवर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमची आवडती कार कमी किंमतीत घरी आणू शकता.

मारुती सुझुकीने देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही खास ऑफर आणली आहे. कंपनीने आपल्या सर्व ऑटोमॅटिक गिअरबॉक्स कारच्या किंमती 5,000 रुपयांनी कमी केल्या आहेत. किंमत कपात 1 जून 2024 पासून लागू आहे.

मात्र, ही सवलत फक्त ऑटोमॅटिक कारवर आहे आणि त्यात मॅन्युअल कारचा समावेश नाही. कंपनीने या सवलतीमागचे कारण सांगितलेले नाही, मात्र ऑटोमॅटिक कारची विक्री वाढवण्यासाठी ही एक रणनीती असू शकते असे बोलले जात आहे.

सध्या, मारुती अल्टो K10, S-Presso, Celerio, Wagon-R, Swift, Dezire, Baleno, FrontX आणि Ignis या मॉडेल्स वर कपंनी सूट देत आहे. या गाड्यांच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, Maruti Suzuki लाइनअपमधील सर्वात परवडणारे AMT मॉडेल Alto K10 VXi आहे, ज्याची किंमत 5.56 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

मारुती सुझुकी या वर्षी तिच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅकची ‘ड्रीम सीरीज’ आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये अल्टो K10, Celerio आणि S-Presso यांचा समावेश आहे. कपंनी या नवीन मर्यादित आवृत्ती मॉडेलमध्ये अधिक वैशिष्ट्ये आणेल. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये असेल. ही कार बजेटफ्रेंडली असून सामान्य लोकांना खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe