Maruti Suzuki : जर तुम्ही भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारचा विचार केला तर, मारुती सुझुकी वॅगनआर, ह्युंदाई i10 मॉडेल, मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा इनोव्हा या कार्सची नाव समोर येतात.
पण तुम्हाला हे माहित आहे का की, मारुतीच्या आणखी एका छोट्या कारने विक्रीच्या बाबतीत सर्वकालीन विक्रम केला आहे. आम्ही मारुती सुझुकी अल्टो कारबद्दल बोलत आहोत, आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत 50 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार करणारी ही एकमेव कार आहे.
कर कारने बाजारातील टॉप कारलाही मागे टाकले आहे. आतापर्यंत कोणतीही लोकप्रिय कार विक्रीचा हा आकडा पार करू शकलेली नाही. विक्रीच्या अहवालानुसार, 2000 मध्ये लॉन्च झालेल्या या लोकप्रिय हॅचबॅकचे सुमारे 5.06 दशलक्ष युनिट्स आतापर्यंत विकले गेले आहेत. आत्तापर्यंत कोणतीही कार मारुती सुझुकी अल्टोचा विक्रम मोडू शकलेली नाही.
याशिवाय, हा एक असा विक्रम आहे जो कधीही मोडणार नाही, असे ऑटो तज्ज्ञांचे मत आहे. मारुती अल्टो 2000 मध्ये लाँच झाली आणि तेव्हापासून ही कार ऑटो मार्केटमध्ये राज्य करत आहे.
मारुती सुझुकी अल्टोची वैशिष्ट्ये
ही कार 1.0-लिटर K10C पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन कमाल ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम कमाल टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड एमटी किंवा 5-स्पीड एएमटीशी जोडलेले आहे. यात 5-स्पीड एमटीसह सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. Maruti Suzuki Alto K10 3.99 लाख ते 5.96 लाख मध्ये उपलब्ध आहे. Maruti Alto K10 ची थेट स्पर्धा Renault Kwid आणि Maruti Suzuki S-Presso शी आहे.