New Maruti Swift Dzire : भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रियता मिळवणारी मारुती सुझुकी डिझायर ही कार अनेक प्रमुख अपडेट्ससह पुन्हा एकदा लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनी सध्या डिझायरच्या फेसलिफ्ट मॉडेलवर काम करत आहे. जे या वर्षाच्या अखेरीस भारतात सादर केले जाऊ शकते. डिझायर फेसलिफ्ट मॉडेल नुकतेच भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान दिसले आहे.
मारुती डिझायरच्या या नवीन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक आकर्षक फीचर्सचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या SUV मध्ये सिंगल-पेन सनरूफ आणि वायरलेस चार्जर देखील असण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना आणखी काय वैशिष्ट्ये पाहायला मिळतील बघा…
वैशिष्ट्ये
डिझायर फेसलिफ्टमध्ये अपडेटेड फीचर म्हणून, त्यात समाविष्ट केलेल्या छोट्या इन्फोटेनमेंट युनिटच्या जागी एक मोठा 9-इंचाचा डिस्प्ले जोडण्यात आला आहे. आगामी मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्टमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले यासारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. सुरक्षेची वैशिष्ट्ये म्हणून, या सेडान कारमध्ये 360-डिग्री कॅमेरासह 6 एअरबॅग समाविष्ट होण्याची शक्यता आहे. ही SUV नवीन 5-स्पोक अलॉय व्हीलसह स्पोर्टी लूकमध्ये येईल. यात मोठी फ्रंट ग्रिल, नवीन एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स, अपडेटेड बंपर आणि नवीन 5-स्पोक अलॉय व्हील मिळतील.
पॉवर ट्रेन
नवीन Dezire मध्ये समाविष्ट असलेल्या पॉवरट्रेनबद्दल सांगायचे तर, Z-सीरीज 1.2-लीटर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन समाविष्ट केले जाऊ शकते. ही कार 82bhp ची पॉवर आणि 108Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी, ते 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्सशी कनेक्ट केले जाईल.
किंमत
नवीन Dezire फेसलिफ्टच्या किंमतीची माहिती अद्याप अधिकृतपणे उपलब्ध नाही. या नवीन Dezire फेसलिफ्ट मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाखांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.