ऑटोमोबाईल

मोदी वापरत असलेल्या मर्सिडीजच ‘ते’ नवीन मॉडल भारतात लाँच

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :-लग्झरी कार बनवणारी कंपनी मर्सिडिज बेंज ने आज भारतात मेबॅक एस-क्लास ला लाँच केले आहे. मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास इम्पोर्टेड मॉडल 680 ला ३.२ कोटी (एक्स शोरूम) किंमतीत लाँच केले आहे.

विशेष बाब म्हणजे मेबॅकचे लक्जरी सेगमेंट जगभरातील राजकारणी आणि जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची या कारला मोठी पसंती आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात सुद्धा या कारचा समावेश आहे.

मर्सिडीज-मेबॅक आपल्या सिग्नेचर डबल एम लोगो, अडवॉन्स्ड इंजिन आणि इंटिरियर फीचर्ससाठी ओळखली जाते. कंपनी या वर्षी भारतात आणखी १० नवीन कार लाँच करणार आहे.

यात त्यांच्या इलेक्ट्रिक कार ईक्यूएसचाही समावेश आहे. मर्सिडीज-मेबॅक एस क्लास मध्ये १९ इंच (इंपोर्ट मॉडलचे २० इंच) मेबॅक ५ होल फोर्ज्ड व्हील्स दिले गेले आहे.

जे रेट्रो मोनोब्लॉक डिझाइन सोबत येतात. मेबॅक एस क्लासच्या टायरला नोइस ऑप्टिमाइजेशन टेक्नोलॉजी सोबत बनवले आहे. एस-क्लास लिमोसिन मध्ये पॉवरफुल १.३ मिलियन मायक्रो – मिरर सोबत डिजिटल हेडलँम्प मिळते. ही कार ५.७ मीटर लांब आहे.

अडवॉन्स्ड कार… ही रायडर्स सनरूफ, लाइट्स, सीट बेल्ट्सला ओपन करणे आणि बंद करणे, दरवाजा बंद करण्यासाठी जेस्चरचा वापर करू शकता. याशिवाय, कारमध्ये ३० स्पीकर दिले आहेत.

मेबॅक एस क्लास भारतात लेवल २ ऑटोनॉम्स ड्रायविंग सॉफ्टेवेयरचा वापर करते. यात सेफ्टीसाठी १३ एअर बॅग दिले आहेत. मर्सिडिज – मेबॅक एस क्लास लिमोसिन २ इंजिन ऑप्शन सोबत येते.

यात पहिले 4.0L V8 इंजिन आहे. जे 496 bhp आणि 700 Nm चे टार्क जनरेट करते. दुसरे, 6.0L V12 इंजिन 603 bhp चे पीक पॉवर आउटपूट आणि 900 Nm चे पीक टॉर्क देते. याचे भारतात प्रोडक्शन केले जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office