MG Motors : MG ची नवीन कार येतेय मार्केटमध्ये; किंमत आणि खास फीचर्स जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

Content Team
Updated:
MG Motors

MG Motors : भारतात झपाट्याने इलेक्ट्रिक कारची संख्या वाढत आहे. ऑटो कंपन्या एका मागून एक वाहने लॉन्च करत आहेत. यामध्ये MG Motors देखील आघाडीवर आहे. कपंनी एका मागे एक आपले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे.

अलीकडेच या कंपनीने Binguo EV या नवीन इलेक्ट्रिक कारचे पेटंट घेतले आहे. ज्यानंतर या कारशी संबंधित अनेक विशेष माहिती समोर आली आहे, अशी अपेक्षा आहे की ही कार पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीची ही कार खूप खास असणार आहे. या कारची रेंज क्षमता खूपच उत्कृष्ट आहे. या कारमधील बॅटरी एका चार्जवर अनुक्रमे 333 किलोमीटर आणि 410 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहेत.

MG च्या नवीन इलेक्ट्रिक कार Bingguo EV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, कारच्या बाह्य भागामध्ये अनेक प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, तसेच आगामी इलेक्ट्रिक कारच्या आतील भागात MG Comet EV सारखे डिझाईन पाहायला मिळू शकते.

तसेच कारच्या बाह्य डिझाईनमध्ये त्याच्या टेललाइट आणि डिस्क ब्रेकमध्ये X-आकाराचे LEDs असतील. तसेच, हेडलाइट्समधील X-आकाराचे LED घटक, 15-इंच चाकांवर वॉटर-स्प्लॅश डिझाइन व्हील कॅप्स, ड्युअल-टोन फ्लोटिंग रूफ यासारखे डिझाइन मिळतील.

जर आपण MG च्या नवीन इलेक्ट्रिक कार Binguo EV च्या लांबी आणि रुंदी बद्दल बोललो तर, आगामी MG Binguo EV SGMW ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि तिची लांबी 3,950mm, रुंदी 1,708mm, उंची 1,580mm आहे. त्याचा व्हीलबेस 2,560 मिमी लांब आहे आणि त्यात 790-लिटर पर्यंत बूट स्पेस आहे.

पॉवरट्रेन

यामध्ये समाविष्ट असलेल्या पॉवरट्रेनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, MG Motors ने 31.9kwh आणि 37.9kwh च्या 2 पॉवरट्रेनसह इंडोनेशियामध्ये 410 किलोमीटरची रेंज देण्याची क्षमता आहे. म्हणजेच ही कार एका चार्जवर 410 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.

MG Bingguo EV किंमत

MG नवीन इलेक्ट्रिक कार Binguo EV च्या किंमतीबाबत माहिती समोर आलेली नाही पण ही कार 19 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत सादर केल्यानंतर ही कार टाटा नेक्सॉन ईव्ही, सिट्रोएन ईसी3 आणि महिंद्रा एक्सयूव्ही400 सारख्या कारशी टक्कर देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe