Mutual Funds : घरबसल्या कमाईची संधी! दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 2.75 कोटी, अशी करा सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mutual Funds : अनेकजण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अनेकांना कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायला आवडते. सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.

परंतु काही जण असे आहेत की ज्यांना जोखीम असणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते. त्यामुळे ते शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये खूप मोठी जोखीम गुंतवणूकदाराला घ्यावी लागते. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 2.75 कोटी रुपये मिळतील. कसे ते पहा.

तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असणार की त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे आता असा प्रश्न पडत आहे की म्युच्युअल फंडाच्या मदतीने तुम्हालाही भविष्यासाठी चांगला निधी जमा करता येईल? तर होय, आता तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे जमा करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला संपूर्ण योजनेसह म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे की हे लक्षात ठेवा की दीर्घ मुदतीसाठी इक्विटी मार्केट आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरले आहे आणि आकडे हे सिद्ध करत आहेत. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची बचत केली तर तुम्हाला सुद्धा दीर्घ मुदतीसाठी म्युच्युअल फंडाद्वारे 2.75 कोटी रुपये जमा करता येतील. कसे ते जाणून घेऊया सविस्तर.

एका वेबसाइटवर सादर केलेल्या एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, एसआयपीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर, तुम्हाला 30 वर्षांनंतर 14% वार्षिक परताव्याच्या आधारे 2.5 कोटी रुपयांपर्यंत परतावा सहज मिळेल. तर यावेळी तुम्ही केवळ 18 लाख रुपये जमा कराल. हे पूर्णपणे संभाव्य परतावे आहेत कारण बाजारात खूप जोखीम असते. जर तुम्हाला जोखीम असणारी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. परंतु तुम्हाला यापूर्वी याबाबत माहिती असावी.