New Bajaj Pulsar:- भारतामध्ये हिरो,होंडा आणि बजाज या तीन कंपन्या प्रामुख्याने बाईक निर्मितीमध्ये अग्रगण्य असून सामान्य ग्राहकांना परवडतील अशा बाईक पासून ते लाखो रुपये किमतीच्या बाईक निर्मितीमध्ये या कंपन्या अग्रस्थानी आहेत.
प्रामुख्याने भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये हिरो तसेच होंडा व बजाज या कंपन्यांच्या बाईक जास्त प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीच्या आहेत. यामध्ये जर बजाजचा विचार केला तर बजाज ने देखील सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतींपासून ते लाख रुपये किमतीच्या बाईक बाजारपेठेत सादर केलेले आहेत
व यामध्ये जर आपण बजाजच्या पल्सरचा विचार केला तर हे शेतकऱ्यांपासून तर नोकरदार वर्गापर्यंत आवडीची बाईक आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून नुकतेच पल्सर NS160 आणि NS200 लॉन्च केल्या होत्या व त्यानंतर आता नवीन रूपामध्ये अपडेट केलेली नवीन 2024 बजाज पल्सर NS125 लॉन्च केली असून ही बाईक आता टीव्हीएस रायडर 125 आणि हिरो एक्स्ट्रीम 125R सोबत स्पर्धा करणार आहे.
या नवीन पल्सरमध्ये काय आहेत नवीन वैशिष्ट्ये?
जर आपण या नवीन पल्सरची डिझाईन पाहिली तर ती पूर्वी सारखीच ठेवण्यात आलेली आहे. पुढच्या बाजूची डिझाईन तसेच इंधन टाकी म्हणजेच फेवरेट टॅंक आणि साईड पॅनल मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. परंतु या नवीन पल्सर मध्ये हेडलाईट काही प्रमाणामध्ये बदलण्यात आलेला आहे.
यामध्ये थंडर शेप एलईडी डीआरएल देण्यात आलेले आहेत. तसेच या नवीन पल्सर मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली असून त्यासोबत पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे. त्यामुळे रायडर एसएमएस आणि कॉल नोटिफिकेशन्स, मोबाईलची बॅटरी लेव्हल यासारखी माहिती मिळणे शक्य होणार आहे.
रायडरच्या सुरक्षेसाठी अँटी लोक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच एबीएस देखील देण्यात आले असून या यूएसबी पोर्टच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन किंवा इयरफोन्स चार्जिंग करू शकणार आहात. तसेच रायडरच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.
तसेच या बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस सिस्टम सह फ्रंट डिस्क आणि रियल ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच या बाईकला 17 इंचाचे आलोय व्हिल्स देण्यात आले आहेत. तसेच या नवीन पल्सरमध्ये पूर्वीसारखेच 125cc चे सिंगल सिलेंडर इंजन आहे व ते पाच स्पीड गिअर बॉक्सशी कनेक्ट आहे.
हे इंजिन 11.8 बीएचपी पावर आणि 11 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक देण्यात आले असल्यामुळे सस्पेन्शन साठी हे खूप महत्त्वाचे आहेत.
किती आहे या पल्सर NS125 ची किंमत?
या नवीन पल्सरची एक्स शोरूम किंमत 1 लाख 4 हजार 922 रुपये असून या किमतीमुळे ती जुन्या मॉडेलच्या तुलनेत पाच हजार रुपयांनी महाग आहे.