Hyundai Creta Facelift : सध्या Hyundai Creta चे Facelift मॉडेल लोकांच्या खूप पसंतीस पडत आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला क्रेटाची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च केली होती, ज्याला तीन महिन्यांत 1 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग मिळाले आहे.
कंपनीने बुकिंगच्या नवीनतम डेटाबद्दल माहिती दिली आहे, त्यानुसार ग्राहकांना सनरूफ आणि कनेक्टेड कारचे फिचर्स सर्वाधिक पसंत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये दिलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा वैशिष्ट्ये, परफॉर्मन्स, आराम आदींसह अनेक वैशिष्ट्यांमुळे ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
Hyundai Creta फेसलिफ्ट जानेवारी 2024 मध्ये 11 लाख रुपयेच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 20.15 लाख रुपये पर्यंत जाते. ही कार ADAS सूटसह देखील येऊ लागली आहे जी कारला अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज करते. याशिवाय कारचे कनेक्टेड एलईडी डीआरएल आणि कनेक्टेड टेल लाईट याला आधुनिक लुक देतात.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना सनरूफ व्हेरियंट्स सर्वाधिक पसंत पडत आहेत. कंपनीला मिळालेल्या एकूण बुकिंगपैकी 71 टक्के बुकिंग सनरूफ वैशिष्ट्यासाठी आहेत, तर 52 टक्के बुकिंग कनेक्टेड कार प्रकारांसाठी आहेत. कंपनीने कारमध्ये लेव्हल 2 ADAS ही प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत. कारमध्ये 36 मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि 70 हून अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.
कंपनची क्रेटा फेसलिफ्ट तीन प्रकारच्या पॉवरट्रेनसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये पहिले 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल, दुसरे 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल आणि तिसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड iMT, ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर, CVT आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्स समाविष्ट आहे.
भारतात, Hyundai Creta मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Highrider, Skoda Kushaq, Volkswagen Taigun, MG Astor आणि Honda Elevate यांच्याशी स्पर्धा करते.