New SUV Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये एसयुव्ही कारला मोठी डिमांड आली आहे. सेडान कारऐवजी आता SUV कार खरेदीला भारतीय ग्राहक अधिक प्राधान्य दाखवत असल्याचे चित्र आहे. यामुळे आता ऑटो कंपन्या देखील नवनवीन एसयूव्ही कार लाँच करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एसयूव्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कार बाजारात एक ऑटो दिग्गज कंपनी लवकरच एक नवीन टॉप क्लास SUV गाडी लॉन्च करणार आहे. निसान कंपनी लवकरच आपली X-Trail SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
ही SUV आतापर्यंत अनेक वेळा चाचणी करताना स्पॉट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी ग्लोबली विकली जात आहे. ही गाडी 2021 पासून काही देशांमध्ये विकली जात आहे. ही एक्स-ट्रेल फुलसाईज एसयूव्ही आहे.
ही नजीकच्या भविष्यात भारतीय कार बाजार लॉन्च होणारी कार रेनॉल्ट-निसान-मित्सुबिशीच्या संयुक्त CMF-C क्रॉसओव्हर प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाणार आहे.
सध्या भारतीय बाजारात निसानची एकच मॅग्नाइट कार विकली जात आहे. दरम्यान, कंपनीने नुकतेच त्यांचे नवीन गिझा स्पेशल एडिशन सुद्धा लाँच केले आहे. आता कंपनीच्या माध्यमातून आणखी एक नवीन SUV लॉन्च केली जाणार आहे.
दरम्यान आता आपण या नव्याने लॉन्च होणाऱ्या SUV कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
मीडिया रिपोर्टनुसार, निसान कंपनीच्या या आगामी SUV मध्ये 1.5 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजन सोबत माईल्ड हायब्रीड आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल युनिट सोबत पावरफुल हायब्रीड पावर ट्रेन पाहायला मिळणार आहे.
माईल्ड हायब्रीड प्रकारात 2WD प्रणाली मिळणार आहे आणि हे इंजिन 163PS/300 Nm आउटपुट तयार करणार आहे. ही कार 9.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड 200 किमी/तास एवढा राहणार आहे.
या कार मध्ये ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह १२.३ इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्राई-जोन क्लाइमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेड लॅम्प, हेड-अप डिस्प्ले, इलेक्ट्रिक टेलगेट, 360 डिग्री कॅमेरासह अनेक अद्ययावत फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
याच्या ग्लोबल व्हेरीयंटमध्ये 5 सीटर आणि 7 सीटर असे सीट कॉन्फिगरेशन पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय बाजारात देखील ही गाडी पाच सीटर आणि 7 सीटर प्रकारात लाँच होऊ शकते असे म्हटले जात आहे.