New Suzuki Access 125 : सुझुकीने लॉन्च केले Access 125 स्कूटरचे नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Suzuki Access 125 : भारतीय दुचाकी निर्माता सुझुकी मोटारसाईकल कंपनीकडून त्यांच्या Access 125 चे नवीन व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. त्यामुळे आता सुझुकी स्कूटर प्रेमींना आणखी एक नवीन स्कूटरचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

सुझुकी कंपनीकडून त्यांच्या नवीन Access 125 या स्कूटरमध्ये ड्युअल-टोन कलर पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये पर्ल शायनिंग बेज / पर्ल मिराज व्हाइट असे रंग पर्याय देण्यात आले आहेत.

सुझुकी कंपनीकडून 4 ऑगस्ट 2023 पासून या नवीन स्कूटरचे स्पेशल एडिशन तसेच राइड कनेक्ट एडिशन सादर केले जाणार आहे. तसेच या नवीन स्पेशल एडिशनची एक्स शोरूम किंमत 85,300 आणि राइड कनेक्ट एडिशन एक्स शोरूम किंमत 90,000 रुपये असणार आहे.

Suzuki Access 125 इंजिन

कंपनीकडून त्यांच्या पहिल्या Suzuki Access 125 या स्कूटरमध्ये रंग पर्याय सोडून इतर कोणतेही बदल केलेले नाहीत. या स्कूटरमध्ये एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 6,750 rpm वर 8.58 bhp आणि 5,500 rpm वर 10 Nm चे पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

ब्रेकिंग आणि सस्पेंशन

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बाईकमध्ये पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिला जात आहे. सुझुकी कंपनीची ही स्कूटर सीबीएस किंवा कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीमसह सादर करण्यात आली आहे.

स्कूटरची वैशिष्ट्ये

Suzuki Access 125 या स्कूटरमध्ये अनके वैशिष्ट्येपूर्ण फीचर्स देण्यात येत आहेत. या स्कूटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप अलर्ट डिस्प्ले, मिस्ड कॉल, ओव्हर स्पीड अलर्ट आणि ब्लूटूथ अशी अनेक फीचर्स देण्यात येत आहेत.

किंमत

Suzuki Access 125 या स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 79,400 रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 90,000 रुपयांपर्यंत जाते. ही स्कूटर Hero Maestro Edge 125, TVS Jupiter 125 आणि Honda Activa 125 ला टक्कर देते.

कंपनीची अपेक्षा

सुझुकी दुचाकी निर्माता कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, येत्या काळात 5 दशलक्ष सुझुकी ऍक्सेसचे उत्पादन एक मोठी संधी आहे. सुझुकी ऍक्सेस 125 ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर आहे. ग्राहकांच्या गरजा पाहून कंपनीकडून या स्कूटरच्या रंग पर्यायांमध्ये बदल करण्यात आला आहे.