New Year 2023 : धक्कादायक ! मार्केटमधून अचानक बंद होणार ‘ह्या’ लोकप्रिय 17 कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Year 2023 :   ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात अनेक कार्स भारतीय ऑटो मार्केटमध्ये लाँच होणार आहे तर दुसरीकडे असे १७ देखील आहे जे या नवीन वर्षात भारतीय ऑटो मार्केटमधून गायब देखील होणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो एप्रिल 2023 मध्ये तब्बल 17 कार्स बाजारातून कायमचे बंद होणार असल्याची मोठी शक्यता आहे. भारतात एप्रिल 2023 पासून नवीन उत्सर्जन मानदंड लागू होणार आहेत, ज्यांना रिअल टाइम ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म्स म्हणजेच RDE म्हणून ओळखले जाते. या नवीन नियमामुळे आता ऑटो कंपन्यांना कारमध्ये अनेक बदल करावे लागणार आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला 17 कारची संपूर्ण यादी देत आहोत ज्या एप्रिल 2023 पासून बंद होणार आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही आता ही कार्स खरेदी करू शकतात.

रिअल टाइम ड्रायव्हिंग एमिशन (RDE) म्हणजे काय  

आत्तापर्यंत देशातील कारच्या उत्सर्जन पातळीची प्रयोगशाळेत टेस्टिंग केली जात होती. परंतु असे आढळून आले की जेव्हा वाहन वास्तविक जीवनात वापरले जाते तेव्हा त्याची उत्सर्जन पातळी वाढते. आता अशा परिस्थितीत सरकारने चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची उत्सर्जन पातळी सतत तपासण्याचा नियम केला आहे. त्यासाठी वाहनांमध्ये उपकरणे लावावी लागणार आहेत.

Hyundai car offers july 2022

प्रगत उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी, वाहनांना चालत्या वाहनाच्या उत्सर्जन पातळीचे परीक्षण करू शकणारे उपकरण असावे लागेल. आता असे झाले तर कारच्या किमतीत मोठी वाढ होईल कारण असे केल्याने कंपनीचा उत्पादन खर्च वाढेल. त्याचा सर्वाधिक परिणाम डिझेल कारवर होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्या आपल्या कार बंद करण्याचा विचार करत आहेत. येथे आम्ही तुमच्यासोबत त्या सर्व 17 कारची यादी शेअर करत आहोत ज्या बंद होणार आहेत.

पुढील वर्षी बंद होणार्‍या 17 कार

Hyundai i20 Diesel

Hyundai Verna Diesel,

Tata Altroz Diesel

Mahindra Marazzo

Mahinda Alturas G4

Mahindra KUV100

Skoda Octavia

Skoda Superb

Renault Kwid 800

Nissan Kicks

Maruti Suzuki Alto 800

Toyota Innova Crysta Petrol

Honda City 4th Gen

Honda City 5th Gen Diesel

Honda Amaze Diesel

Honda Jazz

Honda WR-V

हे पण वाचा :-  IMD Alert : अर्रर्र .. ‘या’ 8 राज्यांमध्ये 26 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स