ऑटोमोबाईल

Nissan Car Discount : निसानच्या शानदार फीचर्स आणि 20 kmpl मायलेज असणाऱ्या कारवर मिळवा हजारोंचा बंपर डिस्काउंट! पहा किंमत

Published by
Ahmednagarlive24 Office

Nissan Car Discount : आजकाल अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहेत. तसेच नवीन कार खरेदी करताना अनेकजण कोणती ऑफर किंवा कंपनीकडून काही डिस्काउंट दिला जात आहे का हे तपासले जाते. मात्र या जुलै महिन्यामध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांच्या कारवर ऑफर दिल्या जात आहेत.

निसान कंपनीकडून त्यांच्या एका कारवर हजारो रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. उच्च मायलेज आणि डॅशिंग वैशिष्ट्ये असलेली कार खरेदी करून तुम्ही पैशांची बचत करू शकता. निसानची कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मॅग्नाइट कारवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे.

निसान कंपनीकडून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मॅग्नाइट कारवर ५० हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ३१ जुलैपर्यंत ही सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही ही कार खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ३१ जुलैपर्यंतच खरेदी करा.

कोणत्या मॉडेलवर किती सूट

Nissan Magnite या कारचे अनेक मॉडेल ऑटो क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. XE मॉडेल वगळता कंपनी 12,100 रुपयांचे तीन वर्षांचे सर्व्हिसिंग पॅकेज देत आहे. तसेच कार खरेदी करताना 7,000 कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. तसेच या कारवर 23,000 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे.

XE आणि XL मॉडेल वगळता 10,000 हजार रुपयांची रोख सूट देखील निसान कडून दिली जात आहे. नॉन-टर्बो XL MT मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंतची रोख सूट देखील देण्यात येत आहे.

निसान मॅग्नाइटमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन

निसान मॅग्नाइट कारमध्ये ९९९ सीसीचे पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. तसेच कारमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनचाही पर्याय कंपनीकडून देण्यात येत आहे. कारमध्ये देण्यात येणारे इंजिन 98.63 PS पॉवर आणि 160 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

कारमध्ये 20 kmpl चा उच्च मायलेज

Nissan Magnite कार 20 kmpl उच्च मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरु होते ते 11.02 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये एकूण पाच मॉडेल उपलब्ध आहेत. XE, XL, XV एक्झिक्युटिव्ह, XV आणि XV प्रीमियम अशी मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत.

Nissan Magnite मध्ये 9.0-इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

निसान मॅग्नाइट कारमध्ये तीन ड्युअल टोन आणि पाच मोनोटोन रंग पर्याय देण्यात येत आहेत. कंपनीची ५ सीटर एसयूव्ही कार आहे. या कारमध्ये 336 लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात येत आहे. तसेच कारमध्ये 9.0-इंचाची HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office