Best Mileage Tractor:- शेतीमध्ये जर सगळ्यात मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर करण्यात येत असेल तर ते म्हणजे ट्रॅक्टर हे होय. शेतीमध्ये बऱ्याच प्रकारची उपकरणे हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे या यंत्रांना कार्यरत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो.
तसेच शेतीच्या पूर्व मशागतीपासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उत्तम अशी ट्रॅक्टर उत्पादित करण्यात आलेले आहेत व शेतकऱ्यांना देखिल ट्रॅक्टर खरेदीमध्ये आणि पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
परंतु यामध्ये जर शेती कामाच्या दृष्टिकोनातून कमीत कमी डिझेल वापरात उत्तम कामगिरी करणारे ट्रॅक्टरच्या शोधात जर तुम्ही असाल तर तुमच्या करिता महिंद्रा कंपनीचे महिंद्रा 405 युवो टेक प्लस 4WD ट्रॅक्टर हा उत्तम पर्याय असू शकतो.
या ट्रॅक्टरमध्ये 39 एचपी जनरेट करणारे शक्तिशाली इंजिन असून कमी डिझेलमध्ये शेतीची जास्तीत जास्त कामे करण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे.
महिंद्रा 405 Yuvo Tech+ 4WD ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
महिंद्रा कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये एम झिप, तीन सिलेंडर इंजिन दिलेले असून जे 39 हॉर्स पावर आणि 170 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये ड्राय कूलिंग प्रकारचे एअर फिल्टर दिले असून जर शेतामध्ये काम करताना इंजिनला धुळीपासून सुरक्षित करते.
या ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 35.5 एचपी आहे व शेतामध्ये वापरण्यात येणारी उपकरणे सहजपणे चालवू शकते. या ट्रॅक्टरचे इंजिन 2000 आरपीएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 1700 किलो इतकी ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे अवजड वाहतूक करण्यासाठी देखील हे ट्रॅक्टर फायद्याचे ठरते. या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 30.63 किमी प्रतितास आणि रिव्हर्स स्पीड 10.63 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे.
महिंद्रा 405 युवा टेक+ 4WD ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली असून शेतात सुरळीत ड्रायव्हिंग करण्यासाठी फायद्याचे ठरते. कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 12 फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गिअर सह एक गिअर बॉक्स दिला आहे. महिंद्रा ट्रॅक्टरला ऑइल एमरस्ड ब्रेक देण्यात आले असून जे टायर्सवर मजबूत पकड ठेवतात आणि निसरड्या पृष्ठभागावरून चाके घसरण्याला अटकाव करतात.
या ट्रॅक्टरमध्ये सिंगल/ ड्युअल क्लच आणि फुल कॉन्स्टंट मेष प्रकारचे ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरमध्ये समांतर कुलिंग इंजिन प्रणाली आहे. जे इंजिनला जास्त गरम होण्यापासून वाचवते. हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येतो व त्याच्या चार टायर्सना पावर पुरवतो.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
महिंद्रा ४०५ युवोटेक प्लस 4WD ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेत एक्स शोरूम किंमत सात लाख 81 हजार ते आठ लाख 43 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. कंपनीने या ट्रॅक्टरसोबत सहा वर्षांची वारंटी दिली आहे.