Car Launch In November:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बाईक तसेच कार लॉन्च करण्यात आले आहेत व यामध्ये परवडणाऱ्या किमतीत जास्तीत जास्त फीचर्स आणि मायलेज देण्याचा प्रयत्न कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
तसेच वाहन खरेदी करताना ग्राहकांना देखील यामुळे आता अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे आपला बजेट आणि हवी असणारे आवडीचे वाहन खरेदी करता येणार आहेत. या अनुषंगाने तुम्हाला देखील या दिवाळीच्या सीजनमध्ये नवीन कार खरेदी करायची असेल तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक नामवंत कार उत्पादक कंपन्यांकडून नवीन मॉडेल्स लॉन्च केली जाणार आहेत.
नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होतील या महत्त्वाच्या कार
1- स्कोडा क्यालाक- साधारणपणे सहा नोव्हेंबर रोजी चेक कार निर्मिती करणारी कंपनी स्कोडा आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करत असून या कंपनीची क्यालाक ही कार कुशाकच्या MQB AO-IN प्लॅटफॉर्मवर आधारित असणार असून ती 1.0- लिटर पेट्रोल इंजिनसह येणार आहे. इतकेच नाही तर ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर बॉक्ससह बाजारात उपलब्ध होणार आहे. सहा नोव्हेंबर रोजी अधिकृतरित्या या कारचे प्रोडक्शन व्हर्जन सादर केले जाणार आहे.
2- मारुती सुझुकी डिझायर- बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेली मारुती सुझुकीची डिझायर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार असून या कारमध्ये कंपनीने नवीन 1.2- लिटर झेड सिरीज पेट्रोल इंजिन दिले आहे. यामध्ये पाच स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटिक गिअर बॉक्सची सुविधा देण्यात आली आहे तसेच यामध्ये नवीन डिझाईन सह इलेक्ट्रिक सनरूफ, नऊ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेन्ट सिस्टम आणि बेज ब्लॅक इंटिरियर यासारखे आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत.
3- मर्सिडीज बेंझ E- क्लास- मर्सिडीज बेंझने आपली नवीन जनरेशन E क्लास भारतामध्ये नऊ ऑक्टोबर रोजी लॉंग वेल बेस्ट वर्जनमध्ये लॉन्च केली होती व आता यामध्ये E200 आणि E220d व्हेरियंटची मागणी वाढली असून आता E450 4 मॅटिक हे जास्त पावरफूल पेट्रोल व्हेरियंट नोव्हेंबर पासून डिलिव्हरीसाठी उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये अतिशय उच्च दर्जाचे फीचर्स समाविष्ट करण्यात आलेले आहेत.